why rekha and amitabh bachchan drift apart this is why their love story ended revealed by a friend
पुढारी ऑनलाईन :
बॉलीवूडच्या अमर प्रेमकथांमध्ये रेखा आणि अमिताभ बच्चन यांची कथा आजही चर्चेत असते. पण तुम्हाला माहीत आहे का की हे दोघे एकमेकांपासून का दूर झाले? अलीकडेच रेखा यांच्या एका मैत्रीणीने याबाबतचा खुलासा केला.
रेखा आणि अमिताभ बच्चन
बॉलीवूड अभिनेत्री रेखा आणि मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या नात्याबद्दल आजही लोक जाणून घेण्यास उत्सुक आहेत. ही प्रेमकहाणी नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. ही बॉलीवूडमधील सर्वात अजरामर प्रेमकथांपैकी एक मानली जाते. इतकी वर्षे झाली तरीही त्यांच्या नात्याचे किस्से आजही प्रसिद्ध आहेत. मात्र आजही लोकांना एकच प्रश्न पडतो दोघे वेगळे का झाले?
रेखाच्या मैत्रिणीने केला खुलासा
आता रेखाची जुनी आणि जवळची मैत्रीण, लेखिका आणि व्यावसायिक बीना रमानी यांनी त्या काळातील काही अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक गोष्टी शेअर केल्या आहेत. यामुळे रेखा त्या काळात कोणत्या मानसिक त्रासातून जात होत्या, हे समोर आले आहे. तसेच रेखा का इच्छित होत्या की अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नात्याला खुलेपणाने स्वीकारावे, याचाही उलगडा झाला आहे.
बीना रमानी यांनी सांगितले रेखाचे दुःख
बीना रमानी यांनी नुकत्याच एएनआयला दिलेल्या मुलाखतीत रेखासोबतच्या त्यांच्या घट्ट मैत्रीबद्दल आणि रेखाच्या भावनिक संघर्षांबद्दल मोकळेपणाने सांगितले. रमानी यांनी स्पष्ट केले की, रेखा अमिताभ आणि आपले नाते लपवू इच्छित नव्हत्या. उलट, त्या ते जगासमोर आणू इच्छित होत्या.
या कारणामुळे ते दोघे दूर झाले...
बीना रमानी यांच्या मते, अमिताभ बच्चन यांचे जया बच्चन यांच्याशी लग्न झाले आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला, यामुळे हे नाते तुटले असे रमानी म्हणाल्या,
“रेखा माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्या काळात ती खूपच निरागस होती. तिने कधी काही चूक केली असेल, तर ती फक्त तिच्या निरागसपणामुळेच होती.”
रेखाचे बालपण कसे होते
“ती आपल्या बालपणातील बंधनांमध्ये अडकलेली होती. आई-वडिलांच्या विभक्त होण्यामुळे तिच्या आयुष्यात प्रेमाची मोठी कमतरता होती आणि त्यामुळे ती कधीही प्रेमाने पूर्णपणे समाधानी राहू शकली नाही.”
रमानी पुढे सांगतात की, “वयाच्या अवघ्या १३-१४ व्या वर्षी रेखाने काम सुरू केले होते, त्यामुळे तिला आपले बालपणही नीट जगता आले नाही.”
अमिताभसाठी होत्या भावनिक
बीना रमानी यांनी सांगितले की, रेखा आयुष्यात नेहमी भावनिक सुरक्षिततेचा शोध घेत होती. तिला तो आधार अमिताभ बच्चन यांच्याकडे मिळाला. जेव्हा रमानी यांना अमिताभबद्दल रेखाच्या भावना काय होत्या, असे विचारले गेले, तेव्हा त्यांना असे वाटले की रेखाचे संपूर्ण आयुष्य अमिताभभोवतीच फिरत होते.
अमिताभ यांना आत्मा मानत होती रेखा
“हो, रेखा असे मानत होती की, आत्म्याने ती अमिताभची आहे आणि आत्म्याने अमिताभही तिचेच आहेत.”
अन्.... नातं शेवटच्या टप्प्यात
बीना रमानी यांनी त्या कठीण काळाबद्दलही सांगितले, जेव्हा हे नाते शेवटच्या टप्प्यात होते. त्यांनी सांगितले की, जेव्हा अमिताभ राजकारणात सक्रिय झाले होते, तेव्हा रेखा त्यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कला गेल्या होत्या.
रमानी म्हणाल्या, “कदाचित अमिताभ बच्चन यांनी रेखाला सांगितले असावे की, आता ते एकत्र राहू शकत नाहीत. त्यांचे नाते कधीच सार्वजनिक होऊ शकणार नाही.”