Who is Raju Kalakar Social Media Star
मुंबई - राजू कलाकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो रातोंरात स्टार कसा बनला? म्युझिक कंपनी टी-सीरीजने त्याला आपल्या म्युझिक अल्बममध्ये काम दिलं आणि हा अल्बम इतका प्रसिद्ध झाला की, लोकांनी त्याचे कौतुक देखील केले. सोशल मीडिया स्टार्समध्ये अनेक नवे चेहरे दिसत असतात. काहींचे तर यातूनचं नशीब पालटले आहे. आता या यादीत राजू कलाकाराचे नाव देखील समाविष्ट झाले आहे. त्याची अनोखी कला आणि गाण्याच्या शैलीने सर्वांचे लक्ष वेधले. हातात दगडी चिप्पी आणि जुनी हिंदी गाणी ही राजूची शैली सध्या चर्चेची ठरली आहे.
'दिल पे चलाई छुरियां' गाणे दगडांच्या तालावर लयबद्ध गाताना त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि यातूनच राजू कलाकार सोशल मीडिया सेन्सेशन बनला.
राजू कलाकारचे खरे नाव राजू भट्ट आहे. राजू गुजरातच्या वडोदरा येथे राहतो. परंतु, तो मूळचा राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात राहणारा आहे. गुजरातच्या सूरतमध्ये त्याची सासूरवाडी आहे. वडोदऱ्यात राहताना राजू मागील पाच वर्षांपासून हॉर्स रायडिंगचे काम करत आहे.
राजूने बॉलीवूड गायक सोनू निगमचीही भेट घेतली. ‘दिल पे चलाई छुरिया’ हे गाणे सोनू निगमनेचं गायलं होतं. राजू सोनू निगमचा म्युझिक व्हिडिओमध्य ‘काचा बादाम गर्ल’ अंजली अरोरा आणि अन्य सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स सोबत एकत्र दिसला. ‘दिल पे चलाई छुरिया’ नवे व्हर्जन १४ जुलैला रिलीज करण्यात आले आहे.
इंटरनेटवर स्टार बनल्यानंतर त्याला बॉलीवुडमधूनही ओळख मिळणे सुरु झालेय. टी-सीरीजच्या अल्बममध्ये राजू दिसला. रिलीजच्या काही दिवस आधी राजूने गायक सोनू निगमशी भेट घेतल्यानंतर त्यांनी सोबत मिळून गाणे देखील गायले होते. आणि सोनू निगमला दगडांनी संगीत निर्माण करण्याची कला देखील शिकवली. हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला.
एका न्यूज वेबसाईटशी बोलताना राजूने सांगितलं होतं की, नुकतात तो त्याच्या सासुरवाडीत पत्नीला आणण्यासाठी गेला होता. पण पत्नीने येण्यास नकार दिला. यामुळे तो खूप दु:खी झाला होता. तेव्हा त्याची भेट १४ वर्षांपूर्वीच्या एका जुन्या मित्राशी झाली. राजनने राजूला सांगितलं की, एक गाणं ऐकवं. त्यावेळीच त्याने त्याला गाणे गावून दाखवलं होतं.