अभिनेता जॉन क्रॅसिंस्की २०२४ चा 'Sexiest Man Alive' ठरला आहे. instagram
मनोरंजन

कोण आहे John Krasinski? जो ठरला २०२४ चा 'Sexiest Man Alive'

अभिनेता जॉन क्रॅसिंस्की ठरला २०२४ चा 'Sexiest Man Alive'

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - पीपल मॅगझीनने जॉन क्रॅसिंस्कीला 2024 चा सर्वात सेक्सी मॅन अलाईव्ह (sexiest man alive) घोषित केले आहे. "द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट"च्या मंगळवारच्या एपिसोडमध्ये क्रॅसिंस्कीचे नाव घोषित करण्यात आले. मॅगझीनने सोशल मीडियावर आपल्या नवीन कव्हरचा फोटोदेखील शेअर केला आहे.

पीपल मॅगझीनने जॉन क्रॅसिंस्की प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आहे. तो ४५ वर्षांचा आहे. तो थ्रिलर A Quiet Place (२०१८) आणि त्याच्या सिक्वेलमध्ये अभिनय करण्यासाठी प्रसिद्ध आहे. जॉन निर्माता देखील आहे. त्याला 'द ऑफिस'साठी अमेरिकन संस्करणमध्ये जिम हेल्पर्टच्या भूमिकेसाठी ओळखले जाते. जॉनने थ्रिलर ए क्वाईट प्लेस आणि त्याच्या सीक्वलमध्ये त्याची पत्नी एमिली ब्लंट सोबत अभिनय आणि दिग्दर्शनही केले आहे.

जॉन क्रॅसिंस्की पत्नी एमिली ब्लंट सोबत

जॉन म्हणाला की, ४१ वर्षांची त्याची पत्नी ब्लंटने मजेत म्हटलं होतं की, ती त्यांचे घर पीपल मॅगजीनच्या कव्हरने सजवण्याची योजना आखत आहे. यावर तो पुढे म्हणाला की, ' कोणताही विचार नव्हता. मला हे वाटलं नव्हतं की, मला सर्वात सेक्सी पुरुष म्हटलं जाईल. हे टायटल मिळाल्यानंतर माझी जबाबदारी आणि स्टॅण्डर्ड दोन्ही वाढलं आहे.

जॉन क्रॅसिंस्की मॅगझीनशी बोलताना म्हणाला, ''हा टायटल मिळाल्यानंतर आता मला अधिक वेळ आपल्या घरी राहावं लागेल. जॉनच्या माहितीनुसार, तो फायदे आणि नुकसान दोन्हींसाठी तयार आहे. क्रॅसिंस्कीला ग्रेज एनाटॉमी स्टार पॅट्रिक डेम्पसीकडून 'सर्वात सेक्सी जीवित पुरुष' चा किताब मिळाला. असं म्हटलं जातं की, मॅगझीनद्वारा टायटल असेच दिले जात नाही. अनेक पॅरामीटर्स असतात. हे पॅरामीटर्स पार करावे लागतात.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT