Maa Behen fame Dharna Durga with Madhuri Dixit and Tripti Dimri  Instagram
मनोरंजन

Dharna Durga | कुशा कपिला, प्राजक्ता कोळीनंतर आता धर्ना दुर्गा! कोण आहे मां-बहेन फेम 'ही' अभिनेत्री?

कुशा कपिला, प्राजक्ता कोळीनंतर धर्ना दुर्गा! कोण आहे मां-बहेन फेम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर?

स्वालिया न. शिकलगार

सोशल मीडियावर आपल्या अनोख्या व्यक्तिरेखा आणि विनोदी कंटेंटमुळे लोकप्रिय झालेली धरना दुर्गा सध्या नेटफ्लिक्सच्या 'मां-बहेन'मुळे चर्चेत आहे. दिल्लीस्थित कंटेंट क्रिएटर असलेल्या धरनाने लाखो फॉलोअर्स मिळवत डिजिटल विश्वात वेगळी ओळख निर्माण केली. आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे.

माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी सध्या त्यांच्या आगामी 'मां बहन' या चित्रपटामुळे धर्ना दुर्गा चर्चेत आली आहे. डार्क कॉमेडी असलेल्या या चित्रपटात धर्ना दुर्गा या अभिनेत्रीने अभिनय साकारला आहे. या चित्रपटात रवी किशन यांचीही एक महत्त्वाची भूमिका आहे. धर्ना दुर्गा कोण आहे, जाणून घ्या.

कोण आहे धर्ना दुर्गा?

धर्नाचे खरे नाव धर्ना कुच्छल आहे. ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. कॉमेडी रील्ससाठी ती ओळखली जाते. सोशल मीडियावर ती खूप प्रसिद्ध आहे. समाजाशी घडलेल्या घटनांशी संबंधित ती विनोदी व्हिडिओ बनवते. ती बहुदा व्हिडिओच्या माध्यमातून गृहिणीची भूमिका साकारताना दिसते.

सोशल मीडियावर ती 'dharnaaaaa' या नावाने लोकप्रिय आहे. तिचे इंस्टाग्रामवर तब्बल 1.8 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रोजच्या आयुष्यातील प्रसंग, ब्युटी पार्लर आंटी, कीर्तन करणाऱ्या महिला, शेजारच्या काकू अशा विविध व्यक्तिरेखा साकारून तिने लाखो चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

धर्ना एक उत्कृष्ट लेखिका आणि कलाकार आहे. ती २४ वर्षांची असून इतक्या कमी वयात तिने चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले आहे. याआधी कुशा कपिला, डॉली सिंग, प्राजक्ता कोळी यासारख्या सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरनी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये यश मिळवलं आहे. धर्नाने २०२२ मध्ये 'भाई बहन व्हर्सेस द वर्ल्ड' या टीव्ही सीरीजमध्ये दिसली होती. तसेच ती जान्हवी कपूरसोबत २०२५ मध्ये 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटात दिसली होती.

मा बहेन चित्रपटामुळे चर्चेत

धर्ना 'मा बहन' या चित्रपटात माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी सोबत दिसली. हा चित्रपट ४ जूनला रिलीज झाला आहे. पण, चित्रपटाच्या एका प्रमोशन व्हिडिओमध्ये धर्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरीवर झाला होता. त्यामुळे धर्ना चांगलीच चर्चेत आली. पण आता दुसरीकडे या दोन्ही अभिनेत्रींनी आपली प्रतिक्रिया दिली.

एका मुलाखतीत माधुरी आणि तृप्ती डिमरी यांनी सांगितलं की, अनेकदा छोट्या गोष्टी देखील मोठे असल्याचे भासवले जाते. तृप्ती म्हणाली, कोणाचाही वाईट हेतू नव्हता. पण चित्रपट रिलीज डेट जवळ आली की, या गोष्टी होतात, ज्याला काहीच अर्थ नसतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT