अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर चित्रपट पुष्पा: द रुल - भाग २ बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड बनवत आहे.  (Image source- Pushpa 2 The Rule)
मनोरंजन

Pushpa 2 OTT release | 'पुष्पा २' OTT वर कधी रिलीज होणार?; निर्मार्त्यांनी सांगितली संभाव्य तारीख

Pushpa 2 The Rule चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, भारतात १ हजार कोटींचा टप्पा पार, हिंदीत सर्वाधिक कमाई

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर चित्रपट पुष्पा: द रुल - भाग २ (Pushpa 2 The Rule) रोज बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड बनवत आहे. आता पुष्पा २ हा राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर 'स्त्री २' च्या कलेक्शनला मागे टाकून आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेला पुष्पा २ चित्रपट OTT वर रिलीज होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यावर चित्रपटाच्या निर्मार्त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

पुष्पा २ निर्मार्त्यांनी शुक्रवारी असे जाहीर केले की अल्लू अर्जुन स्टारर पुष्पा २ चित्रपट लगेच कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार नाही. प्रोडक्शन बॅनर Mythri Movie Makers ने असेही स्पष्ट केले आहे की हा चित्रपट ५६ दिवसांआधी डिजिटल स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार नाही.

Pushpa 2 OTT release : निर्मार्त्यांनी काय सांगितले?

“#Pushpa2TheRule च्या OTT रिलीजबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. पण #Pushpa2TheRule या सर्वात मोठ्या चित्रपटाचा या सर्वात मोठ्या हॉलिडे सीझनमध्ये केवळ मोठ्या पडद्यावर आनंद घ्या. तो ५६ दिवसांपूर्वी कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर दिसणार नाही! #WildFirePushpa केवळ जगभरातील थिएटर्समध्ये पाहाता येईल,” असे X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Pushpa 2 Box Office Collection Day 16 : भारतात १ हजार कोटींचा टप्पा पार

सुकुमार दिग्दर्शित पुष्पा २ चित्रपट ५ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत प्रभास स्टार कल्की 2898 एडी या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात सुमारे ९२ कोटी रुपयांची कमाई केली होती.

Sacnilk च्या माहितीनुसार, या चित्रपटाने भारतात १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 - द रुल आता एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर बाहुबली २ सोबत १ हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

हिंदीत सर्वाधिक कमाई

बाहुबली २ प्रमाणेच पुष्पा २ च्या एकूण कलेक्शनमध्ये डब केलेल्या हिंदी व्हर्जनचे योगदान ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत १६ दिवसांत, या चित्रपटाच्या एकूण १ हजार कोटींपेक्षा अधिक कलेक्शनमध्ये हिंदी व्हर्जनच्या सुमारे ६३० कोटींच्या कलेक्शनचा समावेश आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिंदी व्हर्जनमध्ये कमाई करणारा आणि ६०० कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला चित्रपट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT