

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा ही इंटरनेट सेनसेशन म्हणून ओळखली जाते. ती इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधत असते, इतकेच नाही 'गेम', 'कामसूत्र ३डी' आणि 'पौरुषपुर' या सारख्या चित्रपटांत आणि सीरिजमध्ये तिने अभिनय केला आहे. शर्लिनला करिअरच्या सुरुवातीला दिग्दर्शकांच्या अनेक विचित्र प्रश्नांना सामोरे जावे लागले होते. शर्लिनला कलाविश्वातील कास्टिंग काऊचचाही सामना करावा लागला आहे.
शर्लिन एका मुलाखतीत म्हणाली की, दिग्दर्शक मला खूप विचित्र प्रश्न विचारायचे. माझी कप साईज काय आहे? त्यामुळे मी हैराण व्हायचे. मला प्रश्न पडायचा याचे काय कनेक्शन आहे. लेखकाने कथानकामध्ये असे काय लिहिले की, हीरोईनची कप साईज ए, बी किंवा सी असायला पाहिजे, मग कप साईज नसेल, तर ती चित्रपटाची हीरोईन बनण्याच्या लायकीची नाही काय? कास्टिंग दिग्दर्शकांना भेटल्यानंतर मला खूपच अवघडल्यासारखे वाटायचे.
कलाजगतात डिनरचा अर्थ तडजोड असा असतो, मी बऱ्याचवेळा अशा प्रकारांचा सामना केला आहे, जिथे लाज वाटली जाते. चित्रपट निर्मात्यांचा डाव लक्षात आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणायचे मला अशा गोष्टींमध्ये काहीच स्वारस्य नव्हते. मग मी ठरवले की, मला डिनरला जायचेच नाही.