Welcome To The Jungle Box Office Collection Pudhari
मनोरंजन

Welcome To the Jungle BO: 'वेलकम टू द जंगल'ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई, अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले

Welcome To The Jungle Box Office Collection: अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल' या मल्टिस्टारर चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 27.60 कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Welcome To The Jungle Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याचा बहुप्रतीक्षित 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. भारतासह परदेशातही या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे.

पहिल्याच दिवशी जगभरात 27.60 कोटींची कमाई

निर्मात्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 'वेलकम टू द जंगल'ने पहिल्याच दिवशी जगभरात 27.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. भारतात पेड प्रिव्ह्यूमधून चित्रपटाने 4.07 कोटी रुपये, तर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 15.33 कोटी रुपयांचा नेट गल्ला जमवला. याशिवाय, परदेशातील बॉक्स ऑफिसवरून चित्रपटाने 4.70 कोटी रुपयांची कमाई केली.

अनेक चित्रपटांना मागे टाकले

पहिल्या दिवशीच्या कमाईत 'वेलकम टू द जंगल'ने 2026 मधील अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. यात 'भूत बंगला', 'राजा शिवाजी' आणि 'पेद्दी' यांसारख्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचाही समावेश आहे. बॉक्स ऑफिसवरील ओपनिंगच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक मोठे विक्रम मोडल्याचा दावा करण्यात आला आहे.

30 कलाकारांची भव्य स्टारकास्ट

'वेलकम टू द जंगल' हा लोकप्रिय 'वेलकम' फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. या चित्रपटात जवळपास 30 कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. चित्रपटात अक्षय कुमार, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पाटनी, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, रवीना टंडन यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार झळकत आहेत.

कॉमेडी आणि ट्विस्टने भरलेली कथा

जंगलात उभारल्या जाणाऱ्या 2,000 कोटी रुपयांच्या काल्पनिक चित्रपट प्रकल्पाभोवती फिरणारी ही कथा आहे. कथेत विनोद, गोंधळ, अॅक्शन आणि अनपेक्षित ट्विस्ट पाहायला मिळत असून, त्यामुळे प्रेक्षकांकडून चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT