पुढारी ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड स्टार हृतिक रोशन आणि कियारा आडवाणीचा ॲक्शन चित्रपट वॉर २ साठी इटलीमध्ये एका रोमँटिक गाण्याचे शूटिंग होईल. सूत्रांनुसार, इटलीमध्ये हे शूटिंग १८ सप्टेंबरपासून सुरू होईल. जवळपास १५ दिवस हे शूटिंग सुरु राहिल. वॉर २ च्या निर्मात्यांनी काही नवीन आणि मजेशीर करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हृतिक-कियाराची जोडी सुपरहिट करण्यासाठी इटलीमध्ये रोमँटिक सॉन्ग शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्वत आणि निसर्गात ६ दिवस शूटिंग सुरु राहिल.
हृतिक - कियारा इटलीमध्ये रोमँटिक शूट केल्यानंतर भारतात परततील. काही ॲक्शन -ड्रामा दृश्यांचे शूटिंग देखील करतील. माहितीनुसार, वॉर २ मधील कियारा -हृतिकचा एकदेखील फोटो समोर आलेला नाही. व्हायआरएफ प्रोडक्शन कडून प्र.त्न केला जात आहे की, कोणतेही फोटो, व्हिडिओ लीक होऊ नयेत.
हृतिक-कियारा कोणत्या शहरात जातील, याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. पण, गाण्याचे सुंदर दृश्य चित्रित करण्यासाठी दोन-तीन शहर नक्कीच जातील, असे म्हटले जात आहे. खूप काही सस्पेन्स ठेवण्यात आले आहे. वॉर २ मधील हे गाणे बूस्टर डोसचे काम करेल.