War 2 - Coolie box office Collection
मुंबई - ‘कुली’ ला मागे टाकत ‘वॉर २’चे बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चांगले झाले आहे. तर ‘महावतार नरसिंह’ची कमाई शानदार ठरलीय. बॉक्स ऑफिसवर ऋतिक रोशन-ज्युनियर एनटीआरचा चित्रपट 'वॉर २' ने रजनीकांत यांच्या 'कुली' चित्रपटाला मागे टाकले.
दुसऱ्या दिवशी 'वॉर २'ने जगभरात (स्वातंत्र्यदिनी) १०० कोटींचा टप्पा ओलांडला. हृतिक रोशनने पुन्हा एकदा आपले स्थान बळकट केले. ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर स्टारर अॅक्शनचिपटाने 'टायगर ३' आणि त्याच्या आधीच्या 'वॉर' सारख्या मागील 'स्पाय युनिव्हर्स' चित्रपटांच्या दोन दिवसांच्या कलेक्शनलाही मागे टाकले आहे.
'वॉर २'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दुसऱ्या दिवशीही लक्षणीय होती. रिपोर्टनुसार, 'वॉर २'ने दुसऱ्या दिवशी सर्व भाषांमध्ये अंदाजे ५६.५ कोटी रुपये कमावले. पहिल्या दिवशीच्या ५१.५ कोटी रुपयांच्या आकड्यांपेक्षा जवळजवळ १० टक्के जास्त आहे. हिंदीमध्ये २९ कोटी, तेलुगूमध्ये २२.२५ कोटी रुपये होते.
‘वॉर २’ सोबत चित्रपटगृहात 'कुली' देखील १४ ऑगस्ट रोजी रिलीज झाला. हा चित्रपट ओपनिंग डेच्या कमाईत 'कुली' पेक्षा मागे होता. पण दुसऱ्या दुसऱ्या दिवशी वॉर २ ची ट्रेन सुसाट सुटली. 'वॉर २' ने शुक्रवारी ५६.३५ कोटी रुपये तर गुरुवारी ५२ कोटी कमावले होते. 'वॉर २' ने दोन दिवसात आतापर्यंत १०८.४६ कोटी रुपये कमावले आहेत. आता या दोन्ही चित्रपटांमध्ये जबरदस्त टक्कर होणार आहे, असे दिसते.
सुपरस्टार रजनीकांत यांना चित्रपटांत ५० वर्षे पूर्ण झाल्याने चित्रपट 'कुली' रिलीज झाला होता. कुलीने ओपनिंग डे ला शानदार कमाई केली. मागील शुक्रवारी चित्रपटाने ५३.५ कोटी रुपये कमावले. रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ६५ कोटी रुपयांचे जबरदस्त कलेक्शन केलं. कुलीने दोन दिवसात आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ११८.९३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. हा चित्रपट लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केला असून यामध्ये नागार्जुन, उपेंद्र, आमिर खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
शुक्रवारी, महावतार नरसिंहने ७.२५ कोटी रुपये कमावले. गुरुवारी २.६ कोटी रुपये कमावले. आतापर्यंत चित्रपटाने १९५.६० कोटी रुपये कमावले. 'महावतार नरसिंह'ने पुन्हा एकदा जबरदस्त कलेक्शन केले आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटी रुपये कमावेल. चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केलं आहे.
अहान पांडे - अनीत पड्डा स्टारर 'सैयारा' बॉक्स ऑफिसवर ३२३.१५ कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. शुक्रवारी केवळ १५ लाख रुपये चित्रपटाने कमावले आहेत. त्याआधी गुरुवारी २० लाख रुपये कमावले होते.