14 ऑगस्टला रिलीज झालेल्या वॉर 2 आणि कुलीची या आठवड्याच्या सुरुवातीलाच पिछेहाट होताना दिसत आहे. रविवार हा या सिनेमांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. पण सोमवारने मात्र या सिनेमांचीपण निराशा केली आहे. (Latet Entertainment News)
वॉर 2 च्या कमाईमध्ये -73.87% घट आली आहे. तर कुलीचे आकडेही फारसे आशावादी दिसून येत नाहीत. तर कुलीला -65.53% चा फटका बसला आहे. तरीही कुलीसाठी काहीशी दिलासादायक बातमी अशी की देशभरात कुलीने 200 कोटी क्लबमध्ये एंट्री केली आहे. तर जगभरात हे 400 कोटी क्लबमध्ये या सिनेमाने एंट्री केली आहे.
वॉर या तुलनेत देशभरात 200 कोटीने मागे आहे. हृतिक रोशन, कियारा आडवाणी आणि ज्यू. एनटीआर यांच्या भूमिका असलेला वॉर 2 साठी सोमवार अतिशय वाईट ठरला आहे. अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा 5 व्या दिवशी तिन्ही भाषेतील कलेक्शन मिळूनही 10 कोटी कमवू शकलेली नाही.यामुळे कमाईच्या बाबत वॉर 2 पेक्षा कुली कायमच सरस आहे.
सॅकनिकच्या अहवालानुसार रिलीजनंतरच्या पहिल्या सोमवारी केवळ 8.40 कोटी रुपयेचा बिझिनेस केला आहे.
यातील हिंदी व्हर्जनचे 7 कोटी रुपये
तेलुगूचे 1.25 कोटी रुपये
तर तमिळमध्ये 15 लाख रुपये कमाई
मागील पाच दिवसांत वॉर 2 ने देशभरात जवळपास 183.15 कोटी कमावले आहेत. पण वीकडेजमध्ये हा प्रवास आणखी कठीण होणार आहे. या सिनेमाचे बजेट 400 कोटीचे आहे.
रिलीजदिवशी या सिनेमाने 52 कोटी कमावले होते. तर सोमवारी हेच कलेक्शन 8.40 कोटी आहे. तर रविवारी या सिनेमाने 32.15 कोटी कमावले आहेत.
वॉर 2चा 200 कोटी क्लबच्या एंट्रीमध्ये अजूनही संघर्ष सुरू आहे. गेल्या 5 दिवसांत वॉर 2ने जगभरात 282.50कोटी रुपयांचा बिझनेस केला आहे.
सोमवारचा फटका कुलीलाही चांगलाच फटका बसला आहे. पहिल्या सोमवारी 12.15 कोटीचे नेट कलेक्शन केले आहे. कुलीने मागील पाच दिवसात देशभरात 206. 65 चे कलेक्शन केले आहे.