War 2 Advance Booking updates Instagram
Hrithik Roshan and jr ntr war 2 advanved booking
मुंबई : ऋतिक रोशन-ज्युनियर एनटीआरचा वॉर २ रिलीज होण्याआधी कोटींची कमाई केलीय. ऋतिक रोशनची इतकी क्रेझ आहे की, त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत. लोक ऋतिक आणि सबा आजाद यांचे वय शोधत असून दोघांमधील अंतरदेखील शोधत आहेत.
१४ ऑगस्टला वॉर २ रिलीज होणार आहे. ज्यु. एनटीआर, ऋतिक रोशन सोबत कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान, वॉर २ चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून लोक तिकिट्स खरेदी करत आहेत.
वॉर २ च्या ट्रेलरची जादू
वॉर २ चा ट्रेलर इतका दमदार आहे की, सिनेप्रेमींमध्ये या चित्रपटाचे प्रचंड बझ आहे. वॉर २ च्या ॲडव्हान्स बुकिंग परदेशात आधीच सुरु झाली होती. आता भारतात कोटींची कमाई केली आहे.
ॲडव्हान्स बुकिंगमध्ये किती कोटींची कमाई
रिपोर्टनुसार, वॉर-२ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आतापर्यंत ५.६२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये ब्लॉक सीट्स समाविष्ट असून ६७२३ शोजसाठी ५५७७३ इतकी तिकिट विक्री झालीय.
ॲक्शनने भरपूर वॉर २
वॉर २ मध्ये फॅन्सना जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये ऋतिक - एनटीआर प्लेनवर ॲक्शन करताना दिसणार आबेत. सोबत ऋतिक रोशन-कियारा आडवाणीचा रोमान्स देखील पाहायला मिळणार आहे.
लोक शोधताहेत सबा आजाद-ऋतिक यांचे वय
ऋतिक आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आजाद दोघे २०२२ पासून एकत्र आहेत. दोघांच्या वयामध्ये तब्बल ११ वर्षांचं अंतर आहे. ऋतिक ५० वर्षांचा आहे तर गायिका सबा ३९ वर्षांची आहे. ऋतिक आणि सबा पहिल्यांदा एकत्र करण जोहरच्या ५० व्या वाढदिवसाच्या पार्टीत स्पॉट झाले होते. नंतर अनेक चित्रपटांच्या प्रीमिअरवेळी आणि कौटुंबिक कार्यक्रमावेळी ते एकत्र दिसले होते. या कपलने ऑक्टोबर २०२४ मध्ये आपली तिसरी ॲनिव्हर्सरी साजरी केली होती. वॉर २ च्या निमित्ताने फॅन्स ऋतिक विषयीअधिक जाणून घेण्यास उत्सुक आहेत. ते ऋतिक रोशनचे वय शोधताहेत. शिवाय त्याची गर्लफ्रेंड सबा आजाद आणि त्याच्यामधील वयात किती अंतर आहे, हे देखील सर्च करताहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.