WAR 2 Aavan Jaavan Song released
मुंबई - यशराज फिल्म्सने आज बहुचर्चित चित्रपट 'वॉर 2' मधील पहिलं गाणं 'आवन जावन' रिलीज केलं आहे. हे एक रोमँटिक ट्रॅक असून अभिनेता हृतिक रोशन आणि कियारा अडवाणीची जबरदस्त केमिस्ट्री यात दिसत आहे. 'ब्रह्मास्त्र' मधील हिट गाणं 'केसरिया' बनवणारी टीम पुन्हा एकत्र आली असून त्यांनी हे नवं गाणं आणलं आहे.
दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या या चित्रपटातील गाण्याला प्रीतम यांनी संगीत दिलं आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी शब्द लिहिले आहेत. अरिजीत सिंह आणि गायिका निकिता गांधीने आवाज दिला आहे.
सध्या 'आवन जावन' हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. वायआरएफ ने काल जाहीर केलं होतं की, हे गाणं कियारा अडवाणी च्या वाढदिवसानिमित्त तिला आणि तिच्या चाहत्यांना खास भेट म्हणून देण्यात येणार आहे. आता हे गाणं प्रदर्शित झाल्यावर, याला मिळणारा प्रतिसाद पाहता हे स्पष्ट होतंय की 'आवन जावन' आधीच सुपरहिट ठरलं आहे.
वॉर २ या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे आणि निर्मिती आदित्य चोप्रा यांची आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
कियारा आणि हृतिक रोशनवर चित्रीत करण्यात आलेले गाणे 'आवन जावन'ची झलक या आधी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. या गाण्यात काही रोमँटिक सीन आहेत, जे पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. ट्रेलरमध्ये देखील दोघांनी दिलेला किसींग सीन व्हायरल झाला. कोणतीही खंत न ठेवता कियारा आणि हृतिकने किसींग सीन दिले आहेत. यानंतर दोघांच्या वयातील फरकाची चर्चा होऊ लागली. दोन्ही स्टार्यमध्ये तब्बल १७ वर्षांचे अंतर आहे.