Shah Rukh Khan Vivek Oberoi statement: बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, आज जगभरात ओळख असलेले सुपरस्टारही काही दशकांनी विस्मृतीत जातात. त्यामुळे 2050 मध्ये लोक कदाचित विचारतील “शाहरुख खान कोण?” असा तो म्हणाला.
विवेक ओबेरॉयने स्पष्ट सांगितले की, काळ बदलत जातो तसं लोकांची आवड आणि आठवणीही कमी होत जातात. त्यानी उदाहरण देताना सांगितले की, सिनेमाचा “देव” म्हणून गौरवलेले राज कपूर यांच्याबद्दलही आजच्या नव्या पिढीला फारशी माहिती नाही.
या चर्चेत त्याने असा मुद्दा मांडला की इतिहासात अखेरीस कलाकार केवळ एका कथेत रूपांतरित होतो, आणि प्रेक्षक नवीन चेहऱ्यांकडे वळतात. त्याच्या मते, आजचे चाहते जेवढे भावनिक असतात तेवढेच विसरणारेही असतात.
शाहरुख खान हा मात्र आजही जगातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक मानला जातो. त्याची अलीकडील चित्रपटांची कमाई आणि लोकप्रियता यावरून त्याची क्रेझ कायम असल्याचे दिसते. पण विवेक ओबेरॉय याच्या विधानाने सुपरस्टारडम किती टिकाऊ आहे? हा प्रश्न आहे.
दरम्यान, विवेक ओबेरॉय लवकरच ‘मस्ती 4’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे त्याच्या या वक्तव्याला प्रमोशनचा रंग असल्याचीही चर्चा आहे.