वादग्रस्त हिंदी चित्रपट ' द बंगाल फाईल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मंगळवारी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिनेमाच्या रिलीज डेट बद्दल निश्चित करण्याची अपील केली. त्यांनी आरोप केला की तृणमूल कॉँग्रेसचे कार्यकर्त्यांकडून थिएटर मालकांना हा सिनेमा प्रदर्शित करू नये अशी धमकी दिली जात आहे. (Latest Entertainement News)
डायरेक्ट अॅक्शन डे आणि 1946 च्या कोलकाता दंग्यावर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा 5 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. एक्सवर शेयर केलेल्या एका व्हीडियोमध्ये अग्निहोत्री यांनी बॅनर्जी यांना हात जोडून विनंती केली की त्यांनी त्यांचे म्हणणे मनावर घ्यावे पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी इतिहासाला दाबले जाऊ नये.
ते म्हणतात, ‘मी हात जोडून विनंती करतो की या सिनेमावर बंदी घालू नये.’ यासोबतच त्यांनी दावा केला की हा सिनेमा रिलीज करू नये म्हणून त्यांना धमक्या मिळत आहेत. या सिनेमावर अजून अधिकृत बंदी आणली गेली नाहीये.
या व्हीडियोमध्ये ते पुढे म्हणतात, ‘जर एका जपानी मुलाला हिरोशिमा आणि नागासाकी नरसंहारबाबत माहिती असले पाहिजे तर आपल्या नवीन पिढीला राज्य आणि देशातील महत्त्वाच्या घटनांबाबत का माहिती असू नये? एक खरा बंगाली या सिनेमावर बंगालमध्ये प्रतिबंध घालू शकत नाही. ख्रिस्ती आणि दलित शोषणाच्या कथा पडद्यावर पाहिल्या जात असताना हिंदू नरसंहाराला आपण किती दिवस लपवून ठेवणार आहोत. या सिनेमात अभिनेता मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, सास्वता चटर्जी आणि दर्शन कुमार आहेत.
हा सिनेमा या फाईल्सच्या सिरिजचा तिसरा हप्ता आहे. यामध्ये आधी द ताश्कंद फाईल्स आणि द काश्मीर फाईल्स हे सिनेमे रिलीज झाले होते.