मनोरंजन

Omkara-Desi Boyz : ‘देसी बॉईज’ सिक्वेल आणि ‘ओमकारा’ रिमेकची घोषणा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'देसी बॉईज'च्या सिक्वेलसाठी ज्येष्ठ चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी इरोज इंटरनॅशनल आणि पराग संघवी यांच्याशी हातमिळवणी केलीय. ओमकारा चित्रपटाच्या रिमेकसाठी पंडित यांनी विचारविनिमय केला आहे. ओमकारा (Omkara-Desi Boyz) हा चित्रपट विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपट निर्मात्यांनी अद्यापर्यंत 'या' दोन चित्रपटातील कलाकार कोण कोण असतील, याबाबत खुलासा झालेला नाही. (Omkara-Desi Boyz)

आनंद पंडित म्हणाले, ओमकारा आणि देसी बॉईज चित्रपटाची कहाणी, स्टार कास्ट, संगीत अग्रणी आहे. नव्या पिढीसाठी हा चित्रपट पुन्हा भेटीला येईल. त्यांना पाहता येण्यासारखी चित्रपटाची कहाणी असून, कधीही विसरु शकणारी नाही. पराग संघवी म्हणाले, हा आगामी प्रोजेक्ट थ्रीलर आहे. क्सासिक चित्रपटासाठी मी उत्सुक आहे.

२०११ मध्ये देसी बॉईज हा रोमँटिक कॉमेडी ड्रामा डेविड धवन यांचा मुलगा रोहित धवनने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटासाठी अक्षय कुमार, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोन, चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत होत्‍या.  दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ओमकारा चित्रपट २००६मध्‍ये प्रदर्शित झाला होता. यामध्‍ये अभिनेता अजय देवगण, करीना कपूर, सैफ अली खान, कोंकणा सेन शर्मा, विवेक ओबेरॉय, बिपाशा बासू हे मुख्य भूमिकेत होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT