मनोरंजन

BBMARATHI 3 : जय म्हणतो, तूच आहेस माझा खरा मित्र

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या ( BBMARATHI 3 ) घरामध्ये चक्क मीरामुळे जय आणि विशालची मैत्री आज होणार आहे. आज दिलेल्या एका टास्कमध्ये काही सदस्यांना शिक्षा म्हणून मुख्य घराबाहेर काढायचे आहे. आणि यावरूनच जय, मीरा आणि विकास यांची मीरासोबत बाचाबाची देखील झाली.

पण या शिक्षेमुळेच आता जय आणि विशाल मित्र बनणार का? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. जय, उत्कर्ष, स्नेहा, विशाल आणि विकास यांना मीराने शिक्षेस पात्र ठरवले असून मीराला गाण्याच्या स्वरुपात टोमणे मारणे सुरू आहे. पण, याचनिमित्ताने घरातील सदस्य जरा मज्जामस्ती करताना दिसले. याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरात ( BBMARATHI 3 ) गाण्याची मैफल रंगली आहे.

विकासने उत्कर्षला 'में तो अपनों ने लूटा, गैरों में कहाँ दम था, मेरी कश्ती वहां डूबी, जिस स्विमिंग पूल मै पानी नही था !' असा dialogue सुचवला. त्यावर उत्कर्ष म्हणाला 'अरे हमे तो हमारे कॅप्टनने लुटा, गैरो मै कहा दम था…' मीराने त्यावर उत्तर दिले, 'मला तुझ्यावर जरासुध्दा हसू येत नाहीये, जे बोलायचे आहे ते बोल तू.'

यावर पुन्हा एकदा उत्कर्ष म्हणाला, तिचे आवडते मित्र सगळे खाली तळ्यात आहेत. कसा काय जीव लागेल तिचा. मीरा म्हणाली, सगळे नाहीयेत. त्यावर विकास, उत्कर्ष यांनी गाणं सुरू केलं, 'दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है …' यावर जय विशालला म्हणाला, 'आजपर्यंत तू माझ्यासाठी वेगळा होतास, पण आज तूच आहेस खरा मित्र माझा' यामुळे चाहत्यांना पुढे काय होणार यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अजून काय काय मज्जा केली घरातील सदस्यांनी बघुया आजच्या भागामध्ये. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३०. वा. आपली कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT