पुणे : दत्तवाडी परिसरात लोखंडी गजाने श्वानाला केलं ठार | पुढारी

पुणे : दत्तवाडी परिसरात लोखंडी गजाने श्वानाला केलं ठार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दत्तवाडी परिसरात गल्लीत फिरणार्‍या श्वानाच्या डोक्यात गज घालून त्याला जीवे ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल खेडकर (रा. दत्तवाडी) याच्यावर मुक्या प्राण्यांना क्रुरतेने वागणूक दिल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भारती अशोक साळुंके ( वय ५२, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती साळुंके हे गेल्या दहा ते बारा वर्षापासून पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहतात. काल सोमवारी (दि. ८) रोजी ते राहत्या घराच्या बाहेर उभे होते. याच दरम्यान सकाळच्या सुमारास श्वान गल्लीत फिरत असताना तेथेच राहणार्‍या अमोल खेडकर याने श्वानाच्या डोक्यात लोखंडी गज मारून त्याला जिवे ठार मारले. यानंतर आज भारती अशोक साळुंके यांनी दत्तवाड येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

यानंतर पोलिसांनी फिर्यादीच्या माहितीच्या आधारे अमोल खेडकरवर मुक्या प्राण्यांना जीवे ठार मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक बी. पी. शिरसट गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button