हॉलिवूड स्टार विल स्मिथ अडचणीत सापडला आहे. एका व्हायोलिन वादकाने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप व्हायोलिनवादक ब्रायन किंग जोसेफने केले असून त्याने २०२५ च्या संगीत दौऱ्यात विल स्मिथसोबत काम केले होते. ब्रायन किंगने स्मिथवर गंभीर आरोप केले आहेत की, स्मिथच्या व्यवस्थापन कंपनीने त्याला अपमानास्पद वागणूक दिली आणि त्याला नोकरीवरून हटवले. काय आहे प्रकरण?
मागील वर्षी एका टूर दरम्यान झालेल्या घटनेबद्दल, स्मिथच्या मॅनेजमेंट टीमच्या एका सदस्याने या घटने बाबत खुलासा केला आहे. "मेन इन ब्लॅक" आणि "बॅड बॉईज" सारख्या चित्रपटांचे स्टार विल स्मिथने २०२५ मध्ये "बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी" नावाच्या संगीत दौऱ्यावर सादरीकरण केले होते. या दौऱ्यात व्हायोलिनवादक ब्रायन किंग जोसेफने देखील त्याच्यासोबत सादरीकरण केले होते. तो एक प्रसिद्ध व्हायोलिनवादक आहे आणि "अमेरिकाज गॉट टॅलेंट"मध्ये देखील तो दिसला होता.
ब्रायनचा आरोप आहे की, स्मिथचे वर्तन भीतीदायक आणि अयोग्य होते आणि त्यामुळे त्याला मानसिक त्रास झाला. ब्रायन जोसेफने या दौऱ्यातून चुकीच्या पद्धतीने काढून टाकण्याव्यतिरिक्त लैंगिक छळ आणि धमकी देण्याचे आरोप केले आहेत. व्हायोलिनिस्टने स्मिथ विरोधात खटला दाखल केला आहे. स्मिथवर आरोप केला आहे की, टूरच्या दरम्यान लैंगिक शोषण झालं होतं. त्यानंतर त्याला कामावरून काढण्यात आलं. ही घटना मार्चमध्ये लास वेगासमध्ये स्मिथच्या 'Based on a True Story 2025' टूर दरम्यान घडली होती.
एका रिपोर्टनुसार, ३१ डिसेंबर रोजी लॉस एंजिल्स कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, जोसेफने दावा केला आहे की, स्मिथच्या कंपनीने त्याच्यासाठी एका हॉटेलची रुम बुक केली होती. तो जेव्हा हॉटेलच्या रुममध्ये आला तेव्हा त्याला निदर्शनास आलं की, आधीच कुणीतरी हॉटेलच्या रुममध्ये एंट्री केली होती. त्या व्यक्तीने एक सेक्शुअल मेसेज, वाईप्स, एक बीयरची बॉटल...सोडले होते. जोसेफला एक नोट मिळाली, त्यामध्ये लिहिलं होतं-'ब्रायन, मी ५:३० च्याआधी परत येईन. केवळ आपण दोघे स्टोन एफ.'
जोसेफने दावा केला की, त्याने हे दृश्य पाहून हॉटेल सिक्युरिटी आणि टूर मॅनेजमेंटला रिपोर्ट केलं. पण मॅनेजमेंटने त्यांच्यावर खोटे बोलण्याचा आरोप केला आणि या घटनेसाठी त्यालाच जबाबदार ठरवलं. जोसेफ म्हणाला, काही दिवसानंतर त्याला नोकरीवरून हटवलं. टूर मॅनेजमेंटने त्याला सांगितलं की, टूर 'एक वेगळ्या दिशेकड वळत आहे'. त्याच्या जागी एका नव्या व्हायोलिनिस्टला नोकरीवर ठेवण्यात आले.
तक्रारीत जोसेफने म्हटलं आहे की, त्याचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. भरपाईची रक्कम ज्युरी ठरवेल. विल स्मिथच्या टीमने या नवीन खटल्याच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.