Ritesh post on social media Vilasrao Deshmukh death anniversary
मुंबई - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांचा मुलगा, अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिलीय. सोबतच तीन फोटो शेअर केले आहेत. विलासराव देशमुख यांचे १४ ऑगस्ट, २०१२ रोजी निधन झाले होते. त्यांच्या आठवणीत रितेशने पोस्ट लिहित आठवणी जागवल्या आहेत.
एका फोटोमध्ये राहिल आणि रियान दोघे हात जोडून विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेसमोर बसले आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये ते अभिवादन करताना दिसतात. कमेंट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी त्यांना अभिवादन करत कॉमेंट केले आहेत.
रितेशने फोटो पोस्टमध्ये लिहिलंय- 'आजोबा, आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो!' #vilasraodeshmukh. रितेशने राहिल आणि रियान यांचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. सोबत वडील विलासराव देशमुख यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळत आहे. जेनेलियानेदेखील तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केले आहेत.
रितेश आणि जेनेलियाचा वेड चित्रपट गाजला. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी त्याने जेनेलिया आणि विलासराव देशमुख यांच्याबद्दल सांगितले. रितेश म्हणाला की, 'एकदा जेनिलिया घरी आली, ती आईला भेटायला आली होती. पण तिची आणि वडिलांची भेट कधीच झाली नव्हती. माझ्या आईला जरा आमच्याबद्दल संशय आला होता. कारण, माझी कोणतीच मैत्रीण कधी घरी येत नसे. एकेदिवशी जेनेलिया आली. आणि पप्पा गार्डनमध्ये मिटिंगमध्ये होते. ती एकदम आली आणि म्हणाली, 'हाय पप्पा'. माझे वडील शांत उभे होते. त्यांनी फक्त मान डोलावली.'
विलासराव देशमुख हे जेनेलियाला मुलगी मानायचे. तिचा स्वभाव त्यांना आवडायचा, असे रितेशने सांगितले होते.