पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता विजय थलापती याने काढलेल्या राजकीय रॅलीदरम्यान त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी चेंगराचेंगरी होऊन १२ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिकजण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तमिळ चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीनंतर अभिनेता विजय थलापती याने राजकरणात प्रवेश करत ‘तामिळनाडू वेट्री कळगम’ म्हणजे टीवीके या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाच्या वतीने आज (शनिवारी) सायंकाळी ८ च्या सुमारास रँली काढण्यात आली होती. या रँलीदरम्यान विजय थलापती याला पाहण्यासाठी त्याच्या लाखो चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत ३० हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेनंतर पोलिसांसह बचाव दलांनी घटनास्थळी तातडीने गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल केले. या रॅलीमध्ये ९ वर्षाची मुलगी बेपत्ता झाली असून तिचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.