Rashmika-Vijay Wedding | विजय देवरकोंडाच घर सजलं, समोर आली रश्मिकासोबतच्या लग्नाची पत्रिका file photo
मनोरंजन

Rashmika-Vijay Wedding | विजय देवरकोंडाच घर सजलं, समोर आली रश्मिकासोबतच्या लग्नाची पत्रिका (व्हिडिओ व्हायरल)

उदयपूरमध्ये लग्नाच्या बातम्यांदरम्यान विजयच्या सजलेल्या घराचा व्हिडिओ समोर आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद : पुढारी ऑनलाईन

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. उदयपूरमध्ये लग्नाच्या बातम्यांदरम्यान विजयच्या सजलेल्या घराचा व्हिडिओ समोर आला आहे. विजयचे घर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. त्‍यातच विजय आणि रश्मिकाच्या लग्नाची पत्रिकेची एक झलक समोर आली आहे.

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी अजुनपर्यंत आपल्या रिलेशनशिपबद्दल अजुनही समोर येउन काही खुलासा केलेला नाही मात्र आता त्‍यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. यात सर्वात महत्‍वाची गोष्ट म्हणजे विजय देवरकोंडाचे घराला नव्या नवरीसारखे सजविण्यात आले आहे. घरावर मोठ्या प्रमाणात लाईटच्या माळा आणि फुलांनी सजविण्यात आले आहे.

विजयचे हैदराबादस्थित जुबली हिल्स येथील घर सध्या आकर्षक विद्युत रोषणाईत न्हाउन निघाले आहे. सोशल मीडियावर या घराची काही दृष्ये समोर आली आहेत. चर्चा आहे की, 26 फेब्रुवारी रोजी त्‍यांचे लग्न होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा रंगु लागली आहे की, विजय आणि रश्मिकाचे लग्न उदयपूर येथे होणार आहे.

उदयपूरमध्ये विजय आणि रश्मिकाच्या लग्नाची चर्चा

उदयपूरमध्ये एका पॅलेसमध्ये खासगी समारंभ आयोजित केल्याची बातमी समोर आली होती. यावर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या कुटुंबियांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

जोडप्याच्या लग्नाची पत्रिका

या कपलच्या लग्नाच्या अफवांना हवा देण्यासाठी त्‍यांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे. या निमंत्रण पत्रिकेमध्ये काही भेटवस्तूही दिसून येत आहेत. या निमंत्रण पत्रिकेत या दोघांचे लग्न 26 फेब्रुवारीला होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर हैदराबादमध्ये 4 मार्च रोजी ग्रँड रिसेप्शन आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तुमच्या उपस्थितीने हा क्षण आमच्यासाठी अधिक खास होईल

या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे की, आम्ही नवा अध्याय सुरू करत आहोत. आमच्या एकत्र येण्याचा आनंद साजरा करत असताना आणि हा क्षण अधिक संस्मरणीय करत असताना आमच्यासाठी जी लोक आमच्या जीवनयात्रेतील सोबती आहेत त्‍यांची उपस्थिती आणि आशिर्वाद आणि हा क्षण आमच्यासाठी अधिक खास होईल. आम्ही आमच्या विवाह समारंभात सहभागी होउन आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करत आहोत.

दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये केलंय एकत्र काम

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर या दोघांनी या आधी एकत्र अनेक चित्रपटात काम केलं आहे. त्‍यांनी 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' मध्ये एकत्र काम केलं. या दोघांची पडद्यावरची केमेस्ट्री प्रेक्षकांना भावली. हे दोघे बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. या रोमँटिक जोडीची चर्चा पडद्या पाठिमागेही रंगली. अनेक वेळा हे दोघे परदेशात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेल्याच्या बातम्या समोर आल्या. त्‍यातच या दोघांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT