साऊथ स्टार आणि रश्मिका मंदानाचा पती विजय देवरकोंडाचा अत्यंत साधेपणा पाहायला मिळाला. चित्रपटाचे शूटिंग रद्द झाल्यानंतर त्याचा एक फोटो व्हायरल होतोय, ज्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसतेय. पाऊस सुरु असताना आणि अचानक शूटिंग रद्द झाल्यानंतर विजयने जो निवांत क्षण घालवला आहे, तो हृदयस्पर्शी प्रसंग कॅमेराबद्ध झाला.
पावसाळी सुट्टीत त्याला एक निवांत क्षण घालवण्याची संधी आपल्या आई-वडिलांसोबत मिळाली. हा फोटो खुद्द विजय देवरकोंडाने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. अभिनेत्याने आपल्या पालकांच्यामध्ये झोपलेला एक कँडिड फोटो पोस्ट केला, ज्याला प्रचंड कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव पडत आहे.
बिझी शेड्यूल असताना अचावर शूटिंग पुढे ढकलेले गेले आणि आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आपल्या आई-वडिलांसोबतचा सहवास अनुभवणं, विजयसाठी आनंददायी क्षण ठरला. विजय देवरकोंडाने थोडा वेळ काढून कुटुंबासोबत निवांत क्षण घालवले. तो आपल्या आईच्या कुशीत शांत विसावला. पावसाळ्यातील दुपारच्या क्षणी हा फोटो क्लिक केला.
विजय देवरकोंडाने इन्स्टाग्रामवर हा सुंदर फोटो शेअर केला, त्याला कॅप्शन लिहिले- रिकव्हरी - १०००%." या फोटोमध्ये देवरकोंडा आपल्या आई-वडिलांसोबत गाढ झोपी गेलेला दिसत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "पावसामुळे शूटिंग रद्द. लहानपणीच्या आवडत्या जागी दुपारची डुलकी घेण्याची संधी मिळते. रिकव्हरी - १०००%."
हा फोटो त्याने रश्मिका मंदानाला टॅग केला, ज्यामुळे तिनेच हा फोटो काढला असावा असा असे म्हटले जात आहे. चित्रपटांचे प्रमोशन, कार्यक्रम आणि कामाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर असलेल्या या पोस्टमुळे चाहत्यांना अभिनेत्याचे एक वेगळे रूप पाहायला मिळाले. दुपारची झोप घेण्यासारख्या साध्या गोष्टीला बालपणीच्या आठवणींशी जोडून त्याने आपल्या कॅप्शनला एक भावनिक स्पर्शही दिला.
विजय देवरकोंडाचे आगामी प्रोजेक्ट
विजय शेवटचा 'किंगडम' (२०२५) आणि 'द फॅमिली स्टार' (२०२४) मध्ये दिसला होता. तसेत त्याने 'सिंग गीथम थी.' मध्ये छोटी भूमिका साकारली होती. आता तो 'राउडी जनार्दन' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी किरण कोला करत असून त्याच्यासोबत कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे. तो राहुल सांकृत्यान यांच्या 'रणबाली' (Ranabaali) मध्ये दिसणार असून त्याच्यासोबत रश्मिका मंदाना काम करणार आहे.