Vijay Deverakonda Kingdom movie look and release date
मुंबई - अभिनेता विजय देवरकोंडाचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'किंगडम'ची नवी रिलीज डेट कधी जाहीर होणार याबद्दल सितारा एंटरटेनमेंटने जाहीर केले आहे. चित्रपट निर्माते नागा वामसी असून सोशल मीडिया अकाऊंटवर सिताराने चित्रपटाविषयी अपडेट दिलीय.
किंगडमचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर विजयचा लूक याआधी कधीही पाहिला नसेल असा दिसतो आहे. चेहर्यावर संताप, राग, शक्ती, ऊर्जा दिसून येत आहे. त्याचे फॅन्स चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत. याआधी चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पुढे ३० मार्च २०२५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. नंतर हा चित्रपट ३० मे आणि नंतर पुन्हा ४ जुलै रोजी प्रदर्शित होईल. असे म्हटले जात आहेत. पण आता निर्मात्यांनी तारीख जाहीर केलीय. सोशल मीडियावर काही अधिकृत रिलीज डेट ३१ जुलै कन्फर्म असल्याचे म्हटले जात आहे. तर सितारा एंटरटेनमेंटने आज संध्याकाळी रिलीज डेट प्रोमो ७ वाजून ३ मि. नी जारी करण्यात येईल, असे एक्स अकाऊंटवर म्हटले आहे.
गौतम तिन्नानुरी दिग्दर्शित, किंगडम या चित्रपटात भाग्यश्री बोरसे मुख्य भूमिकेत आहेत आणि त्याला सीतारा एंटरटेनमेंट्स आणि फॉर्च्यून फोर सिनेमाज यांनी पाठिंबा दिला आहे.
याआधी निर्माते नागा वामसी यांनी एक लांबलचक नोट लिहिली. त्यात लिहिले होते, “जेव्हा जेव्हा मी काहीही पोस्ट करतो तेव्हा मला माहित आहे की चित्रपटाच्या विलंबाबद्दल मला गोड टीका मिळतात. पण माझ्यावर विश्वास ठेवा, आमची टीम तुम्हाला मोठ्या पडद्यावर एक मोठा अनुभव देण्यासाठी चोवीस तास काम करत आहे..."