vijay deorkonda 
मनोरंजन

Liger : स्वातंत्र्यदिनी रिलीज झाले विजय देवराकोंडाच्या लायगरचे नवे पोस्टर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत चित्रपटसृष्टीतील (Liger) स्टार्सही स्वातंत्र्याच्या या शुभमुहूर्तावर आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत. या सगळ्याच्या दरम्यान तेलुगू सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्या आगामी 'लायगर' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.  या चित्रपटाच्या टीमने १५ ऑगस्ट रोजी मुख्य अभिनेत्याचा नवीन लूक रिलीज केला आहे आणि सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  (Liger)

'लायगर' निर्माती चार्मी कौरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. ज्यामध्ये विजय देवरकोंडा शर्टलेस लूकमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये तो एखाद्या ॲथलीटप्रमाणे तिरंगा फडकवताना दिसत आहे. तो या चित्रपटात बॉक्सरच्या भूमिकेत दिसत आहे. हे नवीन पोस्टर रिलीज करताना चार्मीने लिहिले आहे, 'लक्षात ठेवा, आम्ही सर्व भारतीय आहोत आणि आम्ही लढवय्ये आहोत किंवा म्हणा फायटरसुद्धा… सर्वांना ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. #LIGER जगभरात रिलीज होण्यासाठी आणखी १० दिवस.'

लायगर या चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. २५ ऑगस्ट, २०२२ रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम भाषेमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अनन्या पांडे ही मुख्य अभिनेत्री आहे जी पहिल्यांदाच साऊथच्या हिरोसोबत काम करत आहे.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT