विग्नेश शिवनने नयनताराच्या वाढदिवसानिमित्त तिला तब्बल कोटींची आलिशान कार भेट दिली. या लक्झरी सरप्राईजमुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला असून नयनताराचा आनंद शब्दात मावेनासा झाला आहे.
Vignesh Shivan gifts luxury car to Nayanthara
मुंबई - दक्षिणेची सुपरस्टार नयनतारा हिचा वाढदिवस नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो. यंदाही तिच्या वाढदिवसाची चर्चा तुफान रंगली कारण तिचे पती दिग्दर्शक विग्नेश शिवन यांनी तिला दिलेली भेट पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. वाढदिवसाच्या खास दिवशी विग्नेशने नयनतारासाठी तब्बल कोटींची आलिशान कार घेऊन तिला सरप्राईज दिले. या
विग्नेश आणि नयनतारा हे दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी कपलपैकी एक. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असून ते नेहमीच एकमेकांप्रतीचा आदर, प्रेम आणि आपुलकी वेगवेगळ्या पोस्टमधून दाखवत असतात. नयनतारा सध्या तिच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे.
अभिनेत्री नयनताराने १८ नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस साजरा केला. साऊथच्या लेडी सुपरस्टारला तिच्या वाढदिवसाला दिग्दर्शक पतीने तिला रॉल्स रॉयस गिफ्ट केली आहे. त्याची किंमत कोटींमध्ये आहे. विग्नेशने सोशल मीडियावर फोटोज शेअर केले आहेत. सोबतच त्याने नयनतारासाठी एक लव्ह नोट देखील लिहिली. जीवनाला सुंदर बनवण्यासाठी धन्यवाद, या कॅप्शनने त्यांच्या नात्यातील प्रेमाची झलक दर्शवली गेली.
विग्नेशने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये एक नवी चमचमती आलीशान कारचा फोटो शेअर करण्यात आला. फोटोमध्ये नयनतारा आणि विग्नेश आपल्या दोन्ही मुलांसोबत एकत्र दिसत आहेत. यानंतर त्याने लिहिलं की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा माझी नयनतारा. तुझा वाढदिवस एक आशीर्वाद आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो...आमच्या आयुष्यात इतके सुंदर क्षण, प्रेम, पॉजिटिविटी देण्यासाठी युनिव्हर्सचे धन्यवाद'.