कॅटरिना आणि विकी कौशल 
मनोरंजन

Vicky Kaushal : ‘कुटुंबीय बाळासाठी दबाव टाकत नाहीत; कॅटरिना स्वतंत्र आहे’

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता विकी कौशल ( Vicky Kaushal ) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफने धुमधडाक्यात विवाह बंधनात अडकले. यानंतर परफेक्ट कपल म्हणून दोघांच्या जोडीची खास वेगळी ओळख निर्माण झाली. दोघांच्या लग्नाला लवकरच दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. यामुळे नेटकरी कॅटरिनाच्या 'गुडन्यूज'ची आतुरतेने वाट पाहात आहेत. काही दिवसांपूर्वी कॅट प्रेग्नंट असल्याची अफवा पसरली होती. आता मात्र, विकी कौशलचे कुटूंबिय तिच्यावर बाळासाठी दबाव टाकत असल्याची चर्चा पसरली आहे. यानंतर विकीने खुलासा करत तसे काही नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अभिनेता विकी कौशलला ( Vicky Kaushal ) एका मुलाखतीदरम्यान त्याच्या आणि कॅटरिनाच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान विकीला त्याचे कुटुंबिय कॅटरिना कैफवर मुलांसाठी दबाव टाकत आहे का? हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना विकीने 'कोणीही कोणावरही दबाव टाकत नाही. बरं प्रत्येकजण खूप मस्त आहे. याबाबतीत कॅटरिनाला तिचे स्वतंत्र आहे. तिला जे हवे असेल ते होईलच.' असे म्हटलं आहे.

दरम्यान या मुलाखतीत लग्नाआधी कॅटरिनाला डेट करत असल्याची माहिती सर्वप्रथम पालकांना दिली असल्याचे त्याने म्हटलं आहे. विकी कौशल आणि कॅटरिना कैफचा विवाह ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील रिसॉर्टमध्ये झाला होता. हा विवाह हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला होता.

वर्कफ्रटबद्दल बोलायचे झाल्यास विकी आगामी 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मिस इंडिया अभिनेत्री मानुषी छिल्लर, मनोज पाहवा आणि कुमुद मिश्रा हे कलाकार दिसणार आहेत. तर कॅटरिना कैफ सलमान खानसोबत 'टायगर ३' मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT