Vicky Kaushal Birthday Post for Katrina Kaif Birthday 
मनोरंजन

Katrina Kaif Birthday |'जान का जन्मदिन' म्हणत विकी कौशलची खास पोस्ट, कॅटरिनाच्या ४३ व्या बर्थडेला फोटोने जिंकली चाहत्यांची मने

'जान का जन्मदिन' म्हणत विकी कौशलची खास पोस्ट, कॅटरिनाच्या ४३ व्या बर्थडेला फोटोने जिंकली चाहत्यांची मने

स्वालिया न. शिकलगार

अभिनेता विकी कौशलने १६ जुलै २०२६ रोजी पत्नी कॅटरिना कैफचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. त्याने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले.

या पोस्टमध्ये त्याने जान का जन्मदिन अशी सुंदर कॅप्शन लिहिलीय. कॅटच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची सुंदर झलक पाहायला मिळाली. फोटोसोबत विकीने तिच्यासाठी लिहिलेला खास संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

शेअर केलेल्या छायाचित्रात पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या फुग्यांनी सजवलेले आणि "Happy Birthday" असा बॅनर दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विकी आणि कॅटरिना एकमेकांना आलिंगन देताना दिसताहेत. विकीच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवतो, तर कॅटरिनाच्या हातात वाढदिवसाच्या केकचा तुकडा दिसून येतो.

कॅटरिनासाठी विकीचा खास संदेश

इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करताना विकीने फक्त, "जानचा वाढदिवस" असे लिहिले. या काही शब्दांमधूनच त्याने पत्नीबद्दलचे प्रेम व्यक्त केले. पोस्ट शेअर होताच चाहत्यांनी कॅटरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला, तर अनेकांनी या दोघांच्या नात्याचे कौतुक करत कमेंट्स केल्या.

विकी आणि कतरिना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही निवडक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. याच महिन्याच्या सुरुवातीला विकीने दोघांचा एक रोमँटिक कृष्णधवल फोटो पोस्ट केला होता. त्या किंचित धूसर फोटोत कॅटरिनाने विकीच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसत होता. तर विकी दूरवर पाहताना दिसत होता. त्या पोस्टला त्याने "पाऊस आणि तू" असे कॅप्शन देत पांढऱ्या रंगाच्या हृदयाचा इमोजी शेअर केला होता.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांनी डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमध्ये अत्यंत खाजगी समारंभात विवाह केला होता. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी मुलगा 'विहान'चे स्वागत केले. ते वेळोवेळी आपल्या आयुष्यातील सुंदर क्षणांची झलक दाखवत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT