तारा सुतारियासोबत ब्रेकअपनंतर वीर पहारियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली एक सूचक आणि भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. “वेळ वाईट असो वा चांगली, ती एक ना एक दिवस बदलते.''
बॉलिवूड विश्वात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे वीर पहारिया. अभिनेत्री तारा सुतारियासोबत ब्रेकअप झाल्यानंतर वीरने सोशल मीडियावर शेअर केलेली एक इन्स्टाग्राम पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमधील शब्द कमी असले, तरी ही पोस्ट तारासाठीच आहे, असे नेटकऱ्यांचे मत आहे.
एपी ढिल्लनच्या मुंबईतील कॉन्सर्टमधील तिच्या परफॉर्मन्सनंतर तारा सुतारिया आणि वीर पहारिया चर्चेत आले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या ब्रेकअपचे वृत्त समोर आले होते. आता वीरने ब्लॅक कलरच्या स्लिव्हलेस टी-शर्टमध्ये, आपली सुडौल शरीरयष्टी दाखवत, एक इन्स्टाग्राम कॅप्शन पोस्ट केले आहे.
काय म्हटलंय वीर पाहारियाने?
‘वेळ वाईट असो वा चांगली, ती एक ना एक दिवस नक्कीच बदलते...’
वीर पहारियाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, “वेळ वाईट असो वा चांगली, ती एक ना एक दिवस नक्कीच बदलते…” या एका वाक्यानेच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. ही पोस्ट पाहून अनेकांनी ती थेट तारा सुतारियासोबतच्या ब्रेकअपशी जोडली आहे. जरी वीर किंवा ताराने ब्रेकअपबाबत अधिकृत विधान केलेलं नसले, तरी सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होती.
वीर आणि तारा यांचे ब्रेकअप झाले आहे का?
मीडिया रिपोर्टनुसार, या जोडप्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांच्या जवळच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. वीर किंवा तारा या दोघांनीही या वृत्तांचे खंडन केलेले नाही. ब्रेकअपचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
एपी ढिल्लनचा कॉन्सर्ट ठरले कारण
वीर आणि तारा, ज्यांच्या नात्यात सर्व काही सुरळीत सुरू होते असे म्हटले जात होते, ते एका अनपेक्षित कारणामुळे चर्चेत आले. तारा आणि वीर यांनी एपी ढिल्लनच्या मुंबईतील कॉन्सर्टमधील व्हायरल व्हिडिओंवर प्रतिक्रिया दिली, जिथे ताराची स्टेजवर गायक ढिल्लनसोबतची जवळीक व्हायरल झाली होती. अफवांना पूर्णविराम देत, ताराने इन्स्टाग्रामवर 'खोट्या कथा' आणि 'पेड पीआर'वर टीका केली होती. वीरनेही स्पष्ट केले की, व्हायरल क्लिप चुकीच्या पद्धतीने एडिट केली गेली होती.
पण दुसरीकडे, नुकताच क्रिती सेनॉनची बहिण नुपूर सेनॉनचे ल्गन पार पडले, यावेळीही तो एकटाच दिसला. त्याच्यासोबत तारा दिसली नाही. त्यामुळे नेटकरींनी ब्रेकअप खरंच झाल्याचे अंदाज बांधत आहेत.
वीर पहारिया हा उद्योगपती कुटुंबातील असून, तो हळूहळू बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत आहे. तारा सुतारियासोबत त्याचं नाव जोडलं गेल्यानंतर तो अधिक चर्चेत आला. दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते, पार्टीज, इव्हेंट्स आणि सोशल मीडियावरील फोटोमुळे त्यांचं नातं उघड झालं होतं. ब्रेकअपनंतर वीरने कोणताही थेट आरोप, तक्रार किंवा खुलासा केला नाही. पण, त्याच्या यंदाच्या पोस्टने तर्कवितर्क लावले जात आहेत. काहींच्या मते, त्याची मानसिकताच तशी झाली आहे, ज्यामुळे तयाने ही पोस्ट केलीय. या पोस्टनंतर मात्र तारा सुतारिया कडून अद्याप कुठलेही स्पष्टीकरण आलेले नाही.