Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Trailer released
मुंबई- बॉलिवूडमध्ये मोठ्या पडद्यावर नवी जोडी पाहायला मिळणार आहे. अभिनेता वरुण धवन आणि रोहित सराफ यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘तुलसी कुमारी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या ट्रेलरमध्ये वरुण धवनचा संस्कारी आणि वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. त्याच्या समोर रोहित सराफने देखील दमदार अभिनयाची छाप सोडली आहे. सोबतच जान्हवी आणि सान्या मल्होत्राने रोमान्सचा तडका लावला आहे.
सनी संस्कारी की तुलसी कुमारी ट्रेलर रिलीज होताच प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. ट्रेलरची कहाणी वरुण धवन (सनी) सुकु होते. जो अनन्या (सान्या मल्होत्रा) च्या प्रेमात पडतो आणि बाहुबली स्टाईलमध्ये प्रपोज करतो. पण अनन्या, सनीचे प्रपोजल नाकारते. तर दुसरीकडे विक्रम (रोहित सराफ) देखील तुलसी (जान्हवी कपूर) शी ब्रेकअप करतो. त्यानंतर सनी - तुलसी आपले प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. सनी, तुलसी नकली लव्हर बनते. विक्रम आणि अनन्याच्या मनात पुन्हा प्रेम जागृत करते. दरम्यान, सनी - तुलसी खोटे प्रेमाचे नाटक करत-करत खऱ्या प्रेमात पडतात.
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' मध्ये वरुण धवन, जान्हवी कपूर, रोहित सर्राफ, सान्या मल्होत्रा, अक्षय ओबेरॉय, मनीष पॉल यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटामध्ये कॉमेडीचा तडका असून चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहेत. यापूर्वी त्यांनी 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.