मुंबई - ओटीटीवर वेबसीरीजचा पूर आलाय. त्यापैकी, चर्चा आहे ती मंडला मर्डर्सची. ज्यामधून वाणी कपूर ओटीटीवर डेब्यू करणार आहे. मर्डर मिस्ट्री मंडला मर्डर्सची खूप दिवसांपासून चर्चा सुरु आहे. प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही. कारण आता सीरीज लवकरच रिलीज होईल. शुक्रवारी ओटीटीवर रिलीज होणाऱ्या टॉप वेब सीरीजमध्ये प्राचीन यंत्र आणि मृत्यूच्या रहस्यांनी भरलेला मंडला मर्डर्स समविष्ट आहे. ओटीटी प्रेक्षकांनी आता ही बहुचर्चित सीरीज पाहण्यासाठी काऊंटडाऊन सुरु केला आहे.
या शुक्रवारी २५ जुलै, २०२५ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही चांगल्या वेब सीरीज आणि चित्रपट पाहता येणार आहेत. पैकी वाणी कपूरचा थ्रिलर मंडला मर्डर्स नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.
धर्म आणि विज्ञानावर आधारित या कहाणीमध्ये आहे तरी काय जाणून घेऊया...
याआधी मंडला मर्डर्सचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ट्रेलरमधून समजते की, वेब सीरीज मंडला मर्डर्सची संपूर्ण कहाणी एक प्राचीन यंत्राच्या अवतीभोवती फिरते. कथेची सुरुवात चरणदासपूरच्या जंगलांतून होते. लोक त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपल्या अंगठ्याची आहुती देतात. तेव्हा सीरीजमध्ये एंट्री होते इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर रिया थॉमसची. वाणी ही भूमिका साकारतेय. हे संपूर्ण प्रकरण सोडवणयासाठी ती जंगलांपर्यंत पोहोचते. मंडला मर्डर्समध्ये वैभव दिल्ली पोलिस अधिकारी विक्रम सिंह यांच्या भूमिकेत आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट तेव्हा येते, जेव्हा अचानक रहस्यमयी मृत्यू व्हायला लागतात. आणि सर्व मृतदेहाच्या डोक्यावर एक विचित्र निशाण असतं. अंगावर शहारे आणणारी ही कथा आहे.
वाणी कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, तिला अनेकदा चित्रपटातून बाहेर काढण्यात आले होते. कारण ती गोरी नव्हती, अनेक निर्मात्यांना वाटत होतं की, तीही भूमिकेसाठी परफेकट नाहीये. ती म्हमाली की, 'एकदा एका निर्मात्याने सांगितलं होतं की, ती इतकी गोरी नाही, ज्यामुळे तिला एखादी भूमिका मिळू शकेल. मला मिल्की व्हाईट अभिनेत्री हवीय. वाणी म्हणाली, मी देखील म्हणाले की, जर हे पॅरामीटर असतील तर मला देखील या प्रोजेक्टचा हिस्सा बनायचं नाही. तुम्ही तुमच्यासाठी मिल्की व्हाईट अभिनेत्री शोधा, मी कुणीतरी चांगला निर्माता शोधेन.'
वाणी कपूरने अखेर 'वॉर २' चा भाग नसल्याबद्दल खुलासा केला आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, तिने निर्मात्यांना सांगितले होते की, 'जर टायगर परत आला तर मीही परत येईन.' फॅन्स तिला सिक्वेलमधून का वगळले आहे, असा प्रश्न विचारत आहेत. पण, वाणीच्या उत्तरावरून वाटते की ती अजूनही या फ्रँचायझीबद्दल उत्सुक आहे. फॅन्सना वाटते की ती वॉर २ मध्ये असू शकते.