Urvashi Rautela  
मनोरंजन

Cannes 2024 च्या रेड कार्पेटवर Urvashi Rautela ने दीपिका पदुकोणला केलं कॉपी

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उर्वशी रौतेला पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली. ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशीचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. तिने फॅशन डिझायनर खालिद आणि मरवान यांनी डिझाईन केलेला सुंदर गाऊन परिधान केला. कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ चा धमाकेदार प्रारंभ फ्रान्समध्ये १४ मे रोजी झाला. या चित्रपट महोत्सवाच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये इंटरनॅशनल सेलेब्सनी सहभाग नोंदवला. या निमित्ताने अनेक बडे स्टार्स कान्स रेड कार्पेटवर दिसले. येते 'तारक मेहता का उल्टा चश्मा' शोमधील अभिनेत्री दीप्ति साधवानी देखील कातिल अंदाजात दिसली. तर आज उर्वशी रौतेलाने कान्सच्या रेड कार्पेटवर चारचाँद लावले.

ऐश्वर्या राय-कियारा अडवाणी रेड कार्पेटवर उतरण्यास सज्ज

  • कियारा यावेळी कान्समध्ये डेब्यू करत आहे
  • ती रेड सी फिल्म फौंडेशनच्या वुमेन इन सिनेमा गाला डिनरची शोभा वाढवेल
  • कान्सच्या रेड कार्पेटवर तिला पाहण्यासाठी तिचे सर्व फॅन्स खूप उत्साहित आहेत
  • हाताला प्लास्टर असताना ऐश्वर्या राय विमानतळावर स्पॉट झाली
  • ती कान्ससाठी रवाना झाली

उर्वशीने दीपिकाचा लूक केला कॉपी?

उर्वशी रौतेलाला पिंक आऊटफिटमध्ये पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना दीपिका पादुकोणची आठवण झाली. उर्वशीने दीपिकाचा गुलाबी आऊटफिट कॉपी केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. २०१८ मध्ये दीपिका पदुकोणने आशी स्टुडिओचा रफल गाऊन घालून कान्समध्ये सहभाग नोंदवला होता. त्यावेळी दीपिकाच्या ड्रेसमध्ये मोठे-मोठे रफल लागले होते. तिने आपल्या गाऊनला पिंक स्टीलेटोजच्या एका पेअरने कंप्लीट केलं होतं.

कसा आहे स्टायलिश आऊटफिट?

उर्वशीला रेड कार्पेटव हॉट पिंक कलरचा कॉर्सेट ड्रेस परिधान केला. ड्रेसच्या शोल्डरवर फ्लफी शिअर मटेरियलने डिझाईन केलं होतं. थाय हाय स्लिट सोबत आउटफिट ती खूप बोल्ड दिसत होती. आपल्या ड्रेससोबत उर्वशी रौतेलाने मॅचिंग हेडपीस घातले होते. ज्यामध्ये मोठे मोठे डायमंड लागले होते. आणि तिच्या हातामध्ये मॅचिंग ग्लोव्ह्ज होते. याशिवाय तिने डायमंड ब्रेसलेट देखील घातले होते.

हेदेखील वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT