अभिनेत्री उर्मिला कानेटकरचा नवा साडीतील लूक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मोरपंखी रंगाची साडी, कुरळ्या केसांचा सुंदर अंबाडा आणि साधा पण आकर्षक अंदाज यामुळे उर्मिलाचा लूक खास ठरत आहे. पारंपरिक साडीला तिने दिलेला कूल टच चाहत्यांना पसंत पडला असून, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानेटकर तिच्या अभिनयासोबतच स्टाईलिश आणि फिटनेस फ्रिक म्हणूनही ओळखली जाते. आता उर्मिलाचा असाच एक सुंदर आणि कूल अंदाज सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. मोरपंखी साडी आणि कुरळ्या केसांचा अंबाडा अशा लूकमध्ये उर्मिलाने सर्वांचेच लक्ष व्धून घेतले आहे.
उर्मिलाने या लूकमध्ये मोरपंखी रंगाची साडी नेसली आहे. साडीचा सुंदर रंग आणि चेहऱ्यावरील गोड हास्यामुळे तिचा लूक खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे, उर्मिलाने आपल्या कुरळ्या केसांचा अंबाडा घातला आहे. या हेअरस्टाइलमुळे तिच्या लूकला एक वेगळाच टच मिळाला आहे.
उर्मिलाने निळ्या रंगाचे स्लिव्हलेस ब्लाऊज आणि मोरपंखी कलर साडी नेसलीय. या लूकमध्ये तिचा स्टायलिश अंदाज दिसत आहे. निसर्गातील तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामुळे उर्मिलाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडताना दिसत आहे.
तिने कॅप्शनही साजेशी लिहिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करताना तिने म्हटलंय-'सौंदर्य आणि अभिजाततेने नटलेली, निसर्गाच्या सानिध्यात'
ती सध्या काय करते, अनवट, कांकण, गुरु यासारख्या चित्रपटामध्ये उर्मिलाने सर्वोत्तम अभिनय केला आहे.