मनोरंजन

Urfi Javed : उर्फी तुला हे करण्याची काय गरज?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : उर्फी जावेद ( Urfi Javed ) नेहमीच चर्चेत असते. पण आता उर्फीने तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेबाबत खुलासा केला आहे. उर्फीने काही फोटो शेअर करत इतरांनाही सावध राहण्याचा सल्ला देत, डॉक्टरांवर निशाणा साधला आहे.

उर्फी ( Urfi Javed )  हिने ओठांची सर्जरी केली होती. त्यामुळे तिला खूपच त्रास झाला आहे. उर्फीचे ओठही सुजले आहेत. उर्फी म्हणाली, तुम्हा सर्वांना माझ्या ओठांच्या सर्जरीबाबत सांगत आहे. मी वयाच्या १८ व्या वर्षी ओठांची सर्जरी केली होती. तेव्हा माझ्याकडे सर्जरी करण्यासाठी पैसे नव्हते. पण मला माझे ओठ आवडत नव्हते. माझे ओठ प्रचंड बारीक होते. मला मोठे ओठ हवे होते. म्हणून मी एका डॉक्टरांकडे गेले होते. ज्या डॉक्टरकडे मी गेले, त्याने कमी पैशांमध्ये माझ्या ओठांची सर्जरी केली. पण ती सर्जरी प्रचंड वेदनादायी होती आणि ते क्षण मला विसरायचे आहेत.

मी तुम्हाला ओठांची सर्जरी करू नका, असे सांगत नाही. मात्र सर्जरी कोणत्या डॉक्टरांकडून करून घेत आहात याची चौकशी करा. उर्फीच्या सल्ल्यावर अनेकांनी कमेंट केली आहे. 'तू कायम सुंदर दिसतेस', अशी एकाने तर 'तुला हे करण्याची काय गरज आहे?' अशी दुसऱ्याने कमेंट केली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT