मनोरंजन

वयाच्या १८व्या ‍वर्षापासून उर्फीला करावं लागत आहे ‘हे’ काम

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उर्फी जावेदने नवे फोटो शेअर केले असून त्या फोटोंध्ये तिचा चेहरा सुजलेला दिसत आहे. इतकचं नाही तर तिने चेहऱ्याला सूज का आली, याबद्दल फोटो पोस्टमध्ये लिहिले आहे. इन्स्टाग्रामवर उर्फी जावेदने आपल्या सजलेल्या चेहऱ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये डोळे आणि ओठावर सूज आलेली दिसते. तिने काही फोटो शेअर करत तिच्या चेहऱ्यावर काही निशाण असल्याचे दिसते. फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता आणि तिचे केस विस्कटलेले दिसताहेत. सकाळी उठल्यानंतर तत्काळ तिने फोटो काढला आहे. तिने एक मोठी नोट लिहिली आहे, यापाठीमागील खरे कारण देखील तिने सांगितले आहे.

अधिक वाचा –

उर्फी जावेदच्या चेहऱ्यावरील सूज कशामुळे आली?

त्या सर्व लोकांना सडेतोड उत्तर दिले, ज्यांनी तिला ट्रोल करत म्हटले होते की, तिने फिलर्सचे खूप अधिक उपयोग केला आहे. तिने आपला फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पुन्हा पोस्ट केला. तिने लिहिलं की, "माझ्या चेहऱ्यावरून खूप सारे कॉमेंट्स पाहायला मिळाले. मी फिलर्सचा खूप उपयोग केल्याचे म्हटले गेले. पण मला खूप मोठी ॲलर्जी आहे, माझा चेहरा अधिक वेळ सुजलेला असतो. मी दुसरे दिवशी उठल्यानंतर माझा चेहरा नेहमी सुजलेला राहतो. मला त्यावेळी अस्वस्थ वाट राहतं."

अधिक वाचा –

उर्फी जावेदने उपचाराबद्दल सांगितले…

तिने पुढे लिहिलं, "फिलर्स नाही आहे मित्रांनो, ॲलर्जी आहे. इम्युनोथेरेपी चालू है, पण, जर तुम्ही मला चेहऱ्यावर सूज आली असताना पाहाल तर समजा की मी, वाईट दिवसांतून जात आहे. मी माझ्या सामान्य फिलर्स आणि बोटॉक्स सिवाय काहीही केलेलं नाही, हे मी वयाच्या १८ व्या वर्षांपासून करत आहे. सहानुभूती दाखवा आणि पुढे जा."

अधिक वाचा –

SCROLL FOR NEXT