Kangana Ranaut x
मनोरंजन

Kangana Ranaut: केंद्रीय मंत्र्याचा फोन आला अन्‌ कंगनाने हटवली 'ती' पोस्ट; पंतप्रधान मोदींचे केले होते कौतूक

Kangana Ranaut: पोस्टमध्ये ट्रम्प यांच्याविषयीही होता उल्लेख

पुढारी वृत्तसेवा

Kangana Ranaut deleted post PM Modi and President Trump

नवी दिल्ली : भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी सोशल मीडियात केलेली एक पोस्ट डिलीट केली आहे. गेल्या काही काळातील घडामोडींवर आधारीत ही पोस्ट होती.

ऑपेरशन सिंदूरचा या पोस्टला संदर्भ होता. शिवाय या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणगाणही केले होते. तथापि, केंद्रीय मंत्र्याचा फोन आल्याने कंगणा राणावत यांनी ही पोस्ट हटवली आहे.

ट्रम्प आणि मोदींची केली होती तुलना

कंगनाने गुरूवारी 15 मे 2025 रोजी सांगितले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी वैयक्तिकरित्या फोन करून अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतची सोशल मीडियावरील पोस्ट हटवण्यास सांगितले.

कंगनाच्या हटवलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प हे भारतात अ‍ॅपलच्या उत्पादनाच्या योजनांबद्दल अस्वस्थ का असावेत यावर तर्क केले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची तुलना केली होती.

इन्स्टाग्रामवरूनही हटवली पोस्ट

कंगनाने एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda जी यांचा फोन आला होता. त्यानंतर मी अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतात ॲपलचे उत्पादन करू नये असे सांगितल्यावरून त्याबाबत पोस्ट केली होती.

पण ते ट्वीट डिलीट करावी असे मला नड्डा यांनी सांगितले. मी माझे वैयक्तिक मत मांडले होते, त्याबद्दल खंत आहे. त्यांच्या सूचनेनुसार मी ती पोस्ट इंस्टाग्रामवरूनही तात्काळ हटवली. धन्यवाद."

कंगनाने पोस्टमध्ये काय म्हटले होते.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटले होते की, "या प्रेमात पडलेल्या विरहिततेचं कारण काय असू शकतं? तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे, पण जगातला सर्वात प्रिय नेता भारतीय पंतप्रधान आहे. ट्रम्पचा दुसरा कार्यकाळ आहे, पण आपल्या पंतप्रधानांचा तिसरा कार्यकाळ आहे.

निःसंशय ट्रम्प ‘अल्फा मेल’ आहेत, पण आपले PM हा ‘सगळ्या अल्फा मेल्सचा बाप’ आहे. तुम्हाला काय वाटतं? हा व्यक्तिगत मत्सर आहे की राजनैतिक असुरक्षितता?"

ट्रम्प काय म्हणाले होते...

ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर कंगनाची ही प्रतिक्रिया आली होती. कारण ट्रम्प यांनी एका व्यावसायिक कार्यक्रमात (दोहा येथे) अ‍ॅपलच्या भारतातील विस्तार योजनांविषयी भाष्य करताना म्हटले होते की, "मी टिम कुक यांना म्हटले, माझ्या मित्रा, मी तुझ्याशी खूप चांगले वागतो आहे. तू 500 अब्ज डॉलर घेऊन येत आहेस, पण आता मी ऐकत आहेस की तू भारतात मोठ्या प्रमाणात आयफोन निर्मिती करत आहेस.

मला नको आहे की तू भारतात आयफोनची निर्मिती करावी. जर तुला भारताची काळजी असेल तरच तू हे करू शकतोस. कारण भारत हा जगातील सर्वाधिक टॅरिफ आकारणारा देश आहे, त्यामुळे भारतात विक्री करणे खूप कठीण आहे."

ट्रम्प यांनी या चर्चेचा परिणाम किंवा अ‍ॅपलच्या भारतातील योजनांमध्ये काही बदल झाले की नाही याविषयी अधिक तपशील दिले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT