मनोरंजन

Ujjain : महाकाल दर्शनासाठी गेलेल्या रणवीर-आलियाला विरोध

स्वालिया न. शिकलगार

उज्जैन : महाकाल दर्शनासाठी उज्जैनला आलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या जोडप्याविरुद्ध तीव्र निदर्शने झाली. जोडप्याला दर्शनाशिवाय परतावे लागले. 'मला बीफ (गोमांस) खायला आवडते' या रणबीर कपूरच्या विधानामुळे हा विरोध करण्यात आला.

'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी आशीर्वाद घ्यायला ते उज्जैनला आले होते. तथापि दिग्दर्शक मुखर्जी यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. रणबीर स्वत:च म्हणाला आहे, की त्याला गोमांस आवडते, मग तो मंदिरात कसा जाऊ शकतो, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागेल, अशी भूमिका बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती.

SCROLL FOR NEXT