मनोरंजन

Kashibai Bajirao Ballal : हे दोन कलाकार काशीबाई-बाजीरावच्या भूमिकेत दिसणार?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काशीबाई बाजीराव बल्लाळ (Kashibai Bajirao Ballal) या छोट्या पडद्यावरील मालिकेत दोन नव्या कलाकारांची एन्ट्री होणार आहे. काशीबाई बाजीराव बल्लाळ मालिकेचा कथेचा प्लॉट पुढे सरकणार आहे. काशीबाईंचा (Kashibai Bajirao Ballal)प्रवास आणि ध्येयपूर्तीसाठी स्टोरीचा प्लॉट पुढे जाणार आहे. आता या मालिकेत तरुणपणातील काशीबाई आणि बाजीराव दिसणार आहेत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्यासाठी दोन कलाकारांची नावे समोर आली आहेत.

शहजादा धामी

रिया शर्मा-शहजादा धामी

सध्या आरोही पटेल ही काशीबाईंच्या भूमिकेत अभिनय करत आहे तर व्यंकटेश पांडे बाजीरावची भूमिका साकारतो आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता आगामी काळात पिंजरा खुबसुरती का फेम अभिनेत्री रिया शर्मा आणि छोटी सरदारनी फेम शहजादा धामी मुख्य भूमिकेत दिसतील. ते अनुक्रमे काशीबाई आणि बाजीरावच्या भूमिकेत दिसतील.

रिया शर्मा

छोट्या पडद्यावरील सौरभ तिवारी शोद्वारे रिया शर्माने प्रसिद्धी मिळवली होती, तर शहजादाने छोटी सरदारनीमध्ये परमची भूमिका केली होती.

९ वर्षांची आहे आरोही पटेल

आरोही पटेल ९ वर्षांची आहे. तिने पहिल्याच लुक टेस्टमध्ये निर्मात्यांची मने जिंकली होती. पेशवा बाजीराव यांची भूमिका साकारणारा व्यंकटेश पांडे (Venkatesh Pandey) , डीआयडी लिटिल मास्टर्समध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

काशीबाईंच्या भूमिकेसाठी घोडेस्वारी

आरोही पटेल म्हणाली होती, ''जेव्हा मला सांगण्यात आलं की, मी काशीबाई बाजीराव बल्लाळमध्ये मुख्य भूमिकेत असेन. तेव्हा मी खूप होते. ही माझी पहिलीच मालिका आहे. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहासातील इतकी प्रतिष्ठित भूमिका साकारण्यासाठी खूपचं उत्साहित आहे. माझ्या टीमने काशीबाईच्या भूमिकेसाठी माझी खूप मदत केली आणि माझी काळजीदेखील घेतली. मी एका सीनसाठी घोडेस्वारीदेखील शिकलीय."

कोण आहे व्यंकटेश पांडे?

या मालिकेत व्यंकटेश पांडे हे  बाजीराव यांच्या भूमिकेत आहे. व्यंकटेश पांडे म्हणाला होता , ''मी महान योध्दा बाजीराव यांच्या भूमिकेत आहे. खूप महत्वाची भूमिका मला साकारायला मिळतीय याचा मला अभिमान आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT