पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांची प्रमुख भूमिका असलेल्या हॉररपट 'स्त्री २' प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. १५ ऑगस्टला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग जोरदार झालेली आहे. यापूर्वी २०१८ला या सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता, आणि बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने तुफान कमाई केली होती.
'स्त्री'चा पहिला भाग हा एका हडळीवर बेतला होता, आणि तर दुसरा भाग हा डोके नसलेल्या एका भूताची आहे. बॉक्स ऑफिसवर 'सर कटे का आतंक' किती धुमाकूळ घालतो हे आता एक दोन दिवसातच स्पष्ट होणार आहे. पण 'स्त्री' ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे, हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. हॉलिवुडमध्ये Conjuring ही भयपट मालिक कोणत्या कोणत्या सत्यघटनेशी जोडलेली असते, तशीच 'स्त्री'ची कथा आहे का असा प्रश्न चाहत्यांना नेहमी पडत आलेला आहे (Is Stree real story).
तर स्त्री ही कथा एका अफवेवर बेतलेली आहे. १९९०मध्ये बंगळुरूत एक अफवा जोरात सुरू होती. असे सांगितले जात होते की एक हडळ रात्री दारा ठोठावते आणि दार उघडणाऱ्याचा खून करते. नातेवाईक, मित्र यांच्या आवाजात ही हडळ दारावर हाक देते आणि त्यामुळे लोक दार उघडतात, अशी ही अफवा पसरली होती. या हडळीला दूर ठेवण्यासाठी लोक घरावार 'नाले बा' असे कन्नडमध्ये लिहीत असतं. 'नाले बा' म्हणजे 'उद्या ये'. ही अफवा तेव्हा फार जोरात होती आणि नंतर ती संपूनही गेली. बंगळुरुतील काही भागात त्या काळी १ एप्रिल हा 'नाले बा' दिवस म्हणून साजरा केला जात असे.