Trisha Krishnan mirror selfie with Thalapathy Vijay
त्रिशाने थलपती विजयसोबत मिरर सेल्फी घेतली Trisha Krishnan Instagram
मनोरंजन

त्रिशाची थलापती विजयसोबत मिरर सेल्फी, २० वर्षात झाला इतका बदल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : थलापती विजयने दोन दिवसांपूर्वी आपला वाढदिवस साजरा केला आहे. तो ५० वर्षांचा झाला आहे. या दरम्यान फॅन्स आणि इंडस्ट्रीतील मित्रमंडळीतील खूप प्रेम आणि शुभेच्छा दिल्या. त्रिशा कृष्णनने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, तो व्हायरल होत आहे. दोघांनी २० वर्षांनंतर एकत्र काम केलं होतं. याआधी दोघे २००४ मध्ये चित्रपट ‘गिली’ मध्ये काम केलं होतं. गिली चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात आला होता.

त्रिशा कृष्णनने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, तो व्हायरल होत आहे. तो फोटो मिरर सेल्फी असून एका लिफ्टमध्ये त्रिशाने विजय थलपतीसोबत फोटो घेतला होता

त्रिशा कृष्णन-थलपती यांच्यात इतका झाला बदल

त्रिशाने विजय सोबत काढलेली मिरर सेल्फी शेअर केली आहे. दोघे एका लिफ्टमध्ये आहेत. फॅन्स या फोटोवर प्रतिक्रिया देताना दिसताहेत. अनेक नेटकऱ्यांनी कॉमेंट सेक्शनमध्ये हार्ट इमोजी शेअर केले आहेत. लोक दोघांचा लूक आणि पर्सनॅलिटीमध्ये बदल झाल्याचीही प्रतिक्रिया देत आहेत. दोघे आधीपासून सुंदर आणि स्मार्ट झाले आहेत.

द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईममध्ये त्रिशा-थलापती विजय

त्रिशा - थलापती विजयने पहिल्यांदा २००४ मध्ये चित्रपट ‘गिली’मध्ये एकत्र काम केलं होतं. यानंतर दोघांनी ‘लियो’मध्ये एकत्र दिसतील. यामधील दोघांची जोडी खूप लोकप्रिय ठरली. थलापती विजय नंतर आता ‘द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम’मध्ये दोघे दिसतील. चित्रपट वेंकट प्रभु दिग्दर्शित करत आहेत. असं म्हटलं जात आहे की, हा विजयचा शेवटचा चित्रपट असेल, त्यानंतर तो राजकारणात उतरेल.

SCROLL FOR NEXT