Taylor Swift Engagement photos viral
मुंबई - ग्लोबल लोकप्रिय अभिनेत्री टेलर स्विफ्टने मंगळवारी साखरपुडा केला आहे. तिचा लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड ट्रॅविस केल्सीने तिला साखरपुड्याची अंगठी घातली. टेलरने एक सुंदर सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही घोषणा केली. टेलर स्विफ्टने अधिकृत इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करून लिहिलंय, ''our English teacher and your gym teacher are getting married.''
टेलर स्विफ्टने डायमंड रिंगचा फोटो पोस्ट केला आहे, जे खूप सुंदर आहेत. रिपोर्टनुसार, डायमंड एक्सपर्टच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, ही साखरपुड्याची अंगठी ८-१० कॅरेटची आहे. जवळपास या अंगठीची किंमत ४ कोटी ३८ लाख ४८ हजारांच्या आसपास आहे.
टेलर स्विफ्ट मागील २ वर्षांपासून ट्रॅविसला डेट करत आहेत. दोघांची पहिली भेट २०२३ मध्ये टेलर स्विफ्टच्या टूरदरम्यान झाली होती. ट्रॅविस या कॉन्सर्टमध्ये उपस्थित होता. एका पॉडकास्टमध्ये ट्रॅविसने सांगितलं की, पहिल्या कॉन्सर्टमध्ये दोघांचे बोलणे झाले नाही. तो टेलरसाठी एक स्पेशल ब्रेसलेट देखील घेऊन पोहोचला होता. पण तिला देऊ शकला नाही, ज्यामुळे तो निराश होता.
टेलर स्विफ्ट लोकप्रिय गायिका आहे. तर ट्रॅविस केल्सी देखील रेकॉर्ड मेकर फुटबॉलपटू आहे. तो १० वेळा प्रो बॉलर आणि ७ वेळा ऑल प्रो होता. त्याच्याकडे १ हजार रिसीव्हिंग यार्ड्यस मिळवण्याचे रेकॉर्डिंग आहे.