Tom Cruise Honorary Oscar award
मुंबई - ८० च्या दशकात आतापर्यंत हॉलीवूड जगतात आपल्या प्रतिभेने छाप सोडणारा लोकप्रिय मेगा सुपरस्टार टॉम क्रूजला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वयाच्या ६३ व्या वर्षी प्रतिष्ठित पुरस्कार ऑस्कर मिळाल्याची घोषणा रात्री उशीरा झाली. एकूण ५४ वर्षाच्या चित्रपट करिअरमध्ये असा सुंदर क्षण पहिल्यांदाच आला आहे, जेव्हा टॉमला अॅकॅडमी मानद पुरस्काराचा किताब मिळाला.
अभिनेता टॉम क्रूजला तीन वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी नॉमिनेशन मिळाले आहे. पण खऱ्या अर्थाने अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली. २०२५ च्या गव्हर्नर्स अवॉर्ड्समध्ये अकॅडमी मानद पुरस्काराने (Honorary Oscar) सन्मानित झालेल्या पहिल्या ऑस्करनंतर अभिनेता अनिल कपूरने टॉम क्रूजचे अभिनंदन केले. अनिल कपूरने एक्सवर ट्विट करत आपल्या मैत्रीला अधोरेखित केले.
अनिल कपूरने ट्विटमध्ये काय लिहिलं?
''तुमची कामगिरी ही जगभरातील सर्व कलाकारांसाठी एक उदाहरण आहे जे चित्रपटसृष्टीत आपले मन आणि आत्मा ओततात. तुमच्या प्रतिभेबद्दल आणि तुमच्या मैत्रीबद्दल धन्यवाद, जी मी कायम जपून ठेवेन...प्रिय मित्रा, या अविश्वसनीय सन्मानाबद्दल अभिनंदन. तुमची आवड, शिस्त आणि उदारता अतुलनीय आहे. जगाने नेहमीच तुमचे कौतुक केले आहे आणि आता त्यांनी तुम्हाला ते देऊन सन्मानित केले आहे जे तुम्ही पात्र आहात.''
१९८१ मध्ये रिलीज झालेल्य़ा एंडलेस लव्हच्या माध्यमातून अभिनेता टॉम क्रूजने अभिनयाची सुरुवात केली. पण १९८३ मध्ये रिलीज झालेला चित्रपट रिस्की बिजनेसमधून अधिक लोकप्रियता मिळाली आणि नंतर मिशन इंपॉसिबल, टॉप गन, जॅक रीचरबॅक टू बॅक हिट चित्रपटही दिले.
दीर्घ प्रतीक्षेनंतर आता टॉम क्रूजला ऑनरेरी ऑस्कर पुरस्कार मिळाला. टॉम क्रूज तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार, तीन स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्काराचा मानकरी आहे. आता मानद पुरस्काराची भरदेखील पडलीय.
Honorary Oscar पुरस्काराचे मानकरी
टॉम क्रूजच नाही तर केवळ हॉलीवूड सिनेमा जगतातील आणखी तिघांना Honorary Oscar मिळाल्याची घोषणा करण्यात आली. ज्यामध्ये म्युझिक आयकॉन डॉली पार्टन, प्रोडक्शन डिझायनर विन थॉमस आणि कोरिओग्राफर डेबी एलनला देखील या खास सन्मानाने सन्मानित केलं गेलं.