मनोरंजन

टॉम क्रूझ बनला सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता

Arun Patil

पुढारी ऑनलाइन डेस्क : हॉलीवूड अभिनेता टॉम क्रूझ याचा चित्रपट 'टॉप गन : मेव्हरिक'ने जगभरात बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाने जगभरात 1.5 बिलियन डॉलर (119 अब्ज रुपयांहून अधिक) एवढी कमाई केली आहे. या चित्रपटाने ट्रान्सफॉर्मर्स ः एज ऑफ एक्सटिंक्शन (1.1 बिलियन), आयर्न मॅन-3 (1.21 बिलियन डॉलर), द फेट ऑफ द फ्युरियस (1.23 बिलियन डॉलर), इनक्रेडिबल्स 2 (1.24 बिलियन डॉलर) या चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. या चित्रपटाच्या यशामुळे टॉम क्रूझ जगात सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता बनला आहे. या चित्रपटातून टॉमने आत्तापर्यंत 800 कोटी रुपये कमवले आहेत.

टॉमनंतर सर्वाधिक कमाई करणार्‍यांच्या यादीत विल स्मिथचा क्रमांक लागतो. विल स्मिथने 'एमान्सिपेशन'मधून 279.88 कोटी रुपये कमवले होते. विल स्मिथला त्याच्या आगामी 'एमान्सिपेशन' चित्रपटासाठी हे 280 कोटी रुपये फी म्हणून देण्यात आले.

या यादीत तिसर्‍या स्थानी आहे अभिनेता लियोनार्डो डिकैप्रियो. लिओने त्याच्या आगामी 'किलर ऑफ द फ्लॉवर मून' या चित्रपटासाठी 239.83 कोटी रुपये मोबदला घेतला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मार्टिन स्कॉर्सेसी यांनी केले आहे.

अभिनेता ब्रॅड पिटने त्याच्या 'फॉर्म्युला 1' या चित्रपटासाठीही 239.83 कोटी रुपये घेतले आहेत. अभिनेता ड्वेन जॉन्सन 'ब्लॅक अ‍ॅडम'साठी 180 कोटी रुपये घेतले आहेत. याशिवाय 'एक्सट्रॅक्शन 2'साठी ख्रिस हेम्सवर्थ, 'इक्वॅलायझर 3'साठी डेंझेल वॉशिंग्टन, 'फास्ट एक्स'साठी विन डिझेल, 'जोकर 2' साठी जोआकिन फिनिक्स, 'व्हेनम 3'साठी टॉम हार्डी, 'स्पिरिट'साठी विल फेरेल आणि रेयान रेनॉल्ड्स यांनी 159.89 कोटी रुपये मानधन घेतले आहे. या यादीत अभिनेत्री मार्गोट रॉबी आणि अभिनेता रायन गॉसलिंग यांचा समावेश आहे.

2022 मध्ये सर्वाधिक शुल्क घेणारे अभिनेते

1. टॉम क्रूज – टॉप गन: मेवेरिक – 800 कोटी
2. विल स्मिथ – एमांसिपेशन – 280 कोटी
3. लियोनार्डो डिकॅप्रियो – किलर्स अफ द फ्लावर मून – 240 कोटी
4. ब्रॅड पिट – फॉर्मुला वन – 240 कोटी
5. ड्वेन जॉनसन – ब्लॅक एडम – 180 कोटी
6. विल फेररेल – स्पिरिटेड – 160 कोटी
7. क्रिस हेम्सवर्थ – एक्सट्रॅक्शन-2 – 160 कोटी
8. विन डिजेल – फास्ट अँड फ्यूरियस-10 – 160 कोटी
9. टॉम हार्डी – वेनम-3 – 160 कोटी
10. जॉकिन फोनिक्स – जोकर-2 – 160 कोटी

SCROLL FOR NEXT