Dilip Joshi grooves to Garba beats with Orry Divyanka Tripathi
मुंबई - लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चश्मा स्टार दिलीप जोशी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये टीव्ही स्टार्सनी गरबा खेळला. या दांडिया नाईटमध्ये दिव्यांका त्रिपाठी, ओरीसह अनेक मोठे स्टार्स पोहोचले आहेत. पण, यामध्ये दयाबेन दिसली नाही, पण जेठालाल मात्र गरबा खेळताना दिसले. यावेळी दिलीप जोशी (जेठालाल) यांची डान्सची सिग्नेचर स्टेपदेखील व्हायरल झाली आहे.
गोकुळधाम सोसायटीमध्ये प्रत्येक सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. पण, गरबा आणि दांडियाचा उत्सव पाहण्यालायक होते. संपूर्ण सोसायटीत दयाबेन पेक्षा चांगला गरबा कुणीही खेळू शकत नाही, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. असो. दयाबेन विना जेठालाल (दिलीप जोशी) स्टेजवर उत्साहात डान्स करताना दिसत आहेत.
काल रात्री मुंबईत गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले होते. या दांडिया इव्हेंटमध्ये जेठालाल दिलीप जोशीने आपली उपस्थिती दर्शवली. इव्हेंटमध्ये समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिलीप स्टेजवर आपली सिग्नेचर स्टेप करताना दिसले. दिलीप यांनी व्हाईट कलर गरबा स्टाईल कुर्ता घातला होता. स्टेजवर अन्य लोक देखील दिलीप यांच्यासोबत डान्स करताना दिसले.
गरबा नाईटमध्ये दिलीप जोशी शिवाय टीव्ही जगतचे अनेक प्रसिद्ध चेहरे देखील दिसले. यामध्ये ओरी, पूनम पांडे, विवेक दहिया, दिव्यांका त्रिपाठी, राम शमीन, बिग बॉस १९ फेम नगमा मिराजकर सारखे अनेक स्टार्स दिसले. इव्हेंटमध्ये ओरी आपल्या डोक्यावर मोठी पगडी घालून डानस करताना दिसला. दिव्यांका पती विवेक सोबत डान्स करताना दिसली. तर देसी लूकमध्ये पूनम पांडे देखील स्पॉट झाली.
video- Viral Bhayani insta वरून साभार