movie Tighee Trailer out now  pudhari photo
मनोरंजन

Tighee Trailer | सोनाली कुलकर्णी-नेहा पेंडसे ठेऊन आल्या ‘तिघी’, ट्रेलरमध्ये उलगडला आई-मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास

Tighee Trailer | सोनाली कुलकर्णी-नेहा पेंडसे ठेऊन आल्या ‘तिघी’, ट्रेलरमध्ये उलगडला आई-मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास

स्वालिया न. शिकलगार

‘तिघी’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यात आई-मुलीच्या नात्यातील जिव्हाळा, मतभेद आणि भावनिक गुंतागुंत प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे. सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे यांच्या अभिनयाची झलक पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

movie Tighee Trailer released

आई आणि मुलगी यांच्यातलं नातं हे अतिशय नाजूक, बहुआयामी आणि खोल भावविश्वाने भरलेलं असतं. कधी अतूट माया, कधी न बोलता समजणारी साथ, तर कधी पिढ्यांतील विचारांमुळे निर्माण होणारे ताणतणाव, या सगळ्यांच्या पलीकडे हे नातं कायम घट्ट राहातं. अशाच भावनिक चढ-उतारांचा आणि वास्तवाच्या पदरांना स्पर्श करणाऱ्या नात्याचा मागोवा घेणारा ‘तिघी’ हा आगामी चित्रपट आता चर्चेत आला आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, त्यात आई-मुलींच्या नात्यातील कोमलता, संघर्ष आणि अंतर्मनातील न बोललेले भाव अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आले आहेत. ‘तिघी’ केवळ एका कुटुंबाची गोष्ट नाही, तर अनेक घरांमध्ये उमटणाऱ्या भावनांचा आरसा आहे, अशी पहिली झलक ट्रेलरमधून दिसते.

या ट्रेलर लाँच सोहळ्यात भारती आचरेकर यांच्यासाठी खास सरप्राईज होते. ते म्हणजे निकटवर्तीयांनी ‘तिघी’च्या रिलीजसाठी चित्रफितीच्या माध्यमातून खास शुभेच्छा दिल्या. यावेळी गायिका प्रियंका बर्वे, शरयू दाते यांनी गाणी सादर केली. यावेळी नेहा पेंडसे, सोनाली कुलकर्णी, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, जिजीविषा काळे, जितेंद्र जोशी, शरयू दाते, प्रियंका बर्वे, निलेश मोहरीर, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्नील भंगाळे, अभिनेत्री गिरिजा ओकही उपस्थित होते.

या चित्रपटात भारती आचरेकर, सोनाली कुलकर्णी, नेहा पेंडसे यांच्या मुख्य भूमिका आहेत. सुप्री मीडिया प्रस्तुत आणि कोक्लिको पिक्चर्स निर्मित ‘तिघी’ची कथा, दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केलं आहे. निर्मिती निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे आणि नेहा पेंडसे यांनी केली आहे.

‘तिघी’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT