Tiger Shroff, Salman Khan File Photo
मनोरंजन

Tiger Shroff: 'इंडस्ट्रीमध्ये फक्त एकच टायगर...': सलमानची स्तुती केल्याने टायगर श्रॉफवर गोळीबार; हल्लेखोराचा धक्कादायक खुलासा

अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाबाबत एक खळबजनक माहिती समोर आली आहे.

मोहन कारंडे

Tiger Shroff Salman Khan shooting

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणाबाबत एक खळबजनक माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, अटक करण्यात आलेल्या एका शूटरने, 'सलमान खानचे कौतुक केल्यामुळेच टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यात आला,' असा दावा केला आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीला टायगर श्रॉफकडून बदला घ्यायचा होता, कारण २०२२ मध्ये एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने सलमान खानचे कौतुक केले होते, अशी माहिती या शूटरने पोलिसांना दिली आहे.

टायगर श्रॉफ काय म्हणाला होता?

पोलिसांच्या चौकशीत शूटरने सांगितल्यानुसार, हा प्रकार टायगर श्रॉफचा 'हिरोपंती २' चित्रपट प्रदर्शित होणार होता, त्यावेळचा आहे. योगायोगाने, हा काळ ईदच्या सणाचा होता. साधारणपणे, सलमान खानचे चित्रपट ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होत असतात. 'हिरोपंती २'च्या प्रमोशनदरम्यान, ईदच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत विचारले असता, टायगर श्रॉफ म्हणाला होता, "या इंडस्ट्रीत फक्त एकच टायगर आहे आणि तो म्हणजे सलमान सर. त्यांच्या तुलनेत मी फक्त एक मांजर आहे. मी 'सिंबा' आहे... म्हणजेच वाघाचे पिल्लू..."

टायगर श्रॉफने हे विधान सलमान खानच्या 'एक था टायगर' आणि त्याच्या सिक्वेलच्या संदर्भात केले होते. त्यावेळी त्याचे हे विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

शूटरच्या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी

पोलिस सूत्रांनुसार, हल्लेखोर फूल सिंग याने तपासकर्त्यांना सांगितले की, त्याला या हल्ल्यामागच्या नेमक्या कारणाबद्दल पूर्ण माहिती नव्हती; परंतु या प्रकरणातील संशयित आणि कथित सूत्रधार अनिल पंडित याने त्याला सांगितले होते की, लॉरेन्स बिश्नोई टोळीला त्या विधानामुळे टायगर श्रॉफचा बदला घ्यायचा होता. पोलीस सध्या या दाव्याची कसून पडताळणी करत आहेत.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने यापूर्वीही सलमान खानशी संबंधित व्यक्तींना धमक्या दिल्या आहेत. अमेरिकेत राहणारा अनिल पंडित आणि टोळीचा आणखी एक सदस्य हरमन संधू यांच्याशी संबंधित काही ऑडिओ समोर आले आहेत. या ऑडिओंमध्ये असा इशारा देण्यात आला आहे की, चित्रपटसृष्टीतील जे लोक सलमान खानसोबत काम करतात, त्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते. १९९८ मधील काळवीट शिकारीच्या प्रकरणावरून या टोळीने अनेकदा सलमान खानकडे जाहीर माफीची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT