Tiger Shroff-Karan Johar  
मनोरंजन

टायगर श्रॉफ नव्या अवतारात; करण जोहर आणतोय भव्य चित्रपट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफ करण जोहरसोबत एका बिग बजेटच्या चित्रपटासाठी तयार आहे. रिपोर्टनुसार टायगर श्रॉफ धर्मा प्रॉडक्शन निर्मित एका चित्रपटात काम करणार आहे. या प्रोजेक्टमध्ये तो याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. सोबतच अनेक स्क्रिप्ट्सचा अभ्यास केल्यानंतर टायगर आणि करण या दोघांनी ही स्क्रिप्ट निवडली आहे. २०२५ मध्ये ही बिग बजेट फिल्म मोठ्या पडद्यावर येणार आहे.

अधिक वाचा-

सूत्रांनुसार, हा चित्रपट एक मनोरंजन करणारा आहे जो भव्य दिव्य असणार आहे. गेल्या १० वर्षात टायगरने केलेल्या भूमिका पेक्षा हे पात्र वेगळे आहे. हा प्रकल्प काय असेल, हे जाणून घेण्यासाठी त्याचे फॅन्स उत्सुक आहेत.

अधिक वाचा-

हा आगामी चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असला तरी टायगरचे काही खास प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत. तो शेवटचा 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये दिसला होता. आता तो 'सिंघम अगेन'च्या रिलीजच्या तयारीत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ॲक्शनर 'बागी ४ साठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

अधिक वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT