They Call Him OG Box Office Collection
मुंबई - 'दे कॉल हिम ओजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगमध्येच जादुई कमाई ठरली आहे. पवन कल्याण आणि इमरान हाशमी यांचा २०२५ मधील सर्वात ओपनिंग चित्रपट ठरला असून वर्ल्डवाईड १५० कोटीपर्यंत पोहोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बॉक्स ऑफिसवर पवन कल्याण आणि इमरान हाशमीचा They Call Him OG आज रिलीज झलाय. रिलीजच्या आधीच या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये विक्रमी कमाई करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
इमरान हाशमी या चित्रपटातून तेलुगू सिनेमात डेब्यू करत आहे. या चित्रपटाने ७.८ कोटींची कमाई भारतीय बॉक्स ऑफिसवर बुधवारी प्रीव्ह्यूमधून कमावले आहेत. एकूण ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ६५ कोटींची कमाई चित्रपटाने आतापर्यंत केली आहे. ज्यामध्ये २३ कोटी पेड रिव्ह्यूमधून आले आहेत.
पवन कल्याण आणि इमरान हाशमी यांची जोडी खास आहे. साऊथ सुपरस्टार पवन कल्याणचा अॅक्शन अवतार आणि इमरान हाशमीचा दमदार खलनायक या दोघांची टक्कर पडद्यावर पाहायला मिळतेय. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती. चित्रपट समीक्षकांचा अंजात आहे की, They Call Him OG हा चित्रपट पहिल्या तीन दिवसांतच तब्बल १५० कोटींचा टप्पा गाठेल.
जगभरातील प्री सेल्समधून ९० ते ९८ कोटी ओजीने कमावले आहेत. भारतात ६० ते ६५ कोटी तर ओव्हरसीज मार्केटमधून ३० ते ३३ कोटी कमावले आहेत. चित्रपटाने अनेक तेलुगु चित्रपटाच्या अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. They Call Him OG ने रिलीजच्या आधीपासूनच बॉक्स ऑफिसवर धडाका सुरु केला आहे. पुढील काही दिवसांत हा चित्रपट कोणते नवे रेकॉर्ड मोडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिग्दर्शन सुजीत यांनी केले असून पवन कल्याण ओजस गंभीराच्या भूमिकेत आहेत. तर इमरान हाशमी ओमी भाऊच्या भूमिकेत आहे. शिवाय, प्रियांका मोहन, अर्जुन दास, श्रेया रेड्डी आणि प्रकाश राज महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.