Bhumi Pednekar-Ishaan Khattar The Royals OTT Release
मुंबई : द रॉयल्स वेब सीरीज चर्चेत आहे. या सीरीजमध्ये ईशान खट्टर-भूमी पेडनेकर मुख्य भूमिकेत आहे. ही सीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. द रॉयल्सचे अनेक पोस्टर रिलीज झाले होते, तेव्हापासून फॅन्सची उत्सुकता वाढली होती. आता प्रतीक्षा संपली असून दुपारनंतर ही सीरीज रिलीज करण्यात आलीय.
नेटफ्लिक्सने द रॉयल्स रिलीजची तारीख आधीच घोषित केली होती. पण, रात्री १२ वाजता रिलीज करण्यात आलेलं नाही. तर दुपारी 12:30 वाजता रिलीज करण्यात आलं आहे. फॅन्सना सकाळपासून नेटफ्लिक्सवर सीरीजची प्रतीक्षा लागून राहिली होती. सीरीजमध्ये ईशान खट्टर, भूमी पेडनेकर, जीनत अमान, साक्षी तंवर, विहान, मिलिंद सोमन, चंकी पांडे, नोरा फतेही आणि डिनो मोरिया मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरीज प्रियांका घोष आणि नुपुर अस्थानाने दिग्दर्शित केला आहे.
द रॉयल्स ही सीरीज अजिबात रॉयल वाटत नाही, 8 एपिसोडमध्ये एक रॉयल परिवार दिवाळखोर, समाजातील त्यांच्या आदरासोबत एक महाराज आणि एक हॉस्पिटॅलिटी कंपनीच्या सीईओची प्रेम कहाणी आहे. सोफिया शेखर (भूमी पेडनेकर) श्रीलंकेच्या बीचवर रनिंग करताना सीरीजची सुरुवात होते. तिला मध्येच एक व्हिआयपी फोटोशूटमुळे थांबवले जाते. परंतु, ती कुणाचेही बोलणे न ऐकून घेताल आपले रनिंग पूर्ण करते. या दरम्यान, घोड्यावर स्वार अविराज (ईशान खट्टर) शी. तो एक मॉडल आहे.
दोघांच्या दोन वेळा भेटी होतात. पण त्यांना एकमेकांविषयी माहिती नसतं की ते कोण आहेत? अविराज, राजस्थानचे मोरपूरचे महाराजा आहे आणि सोफिया, मुंबईच्या एका मोठ्या हॉस्पिटॅलिटी कंपनीची सीईओ आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर अविराज आणि त्यांचा शाही परिवार कंगाल झाला आहे. त्याचे वडील युगनाथ सिंह आपली सर्व आर्थिक संपत्ती कुण्या 'मॉरिस'च्या नावावर केली आहे आणि पत्नी -मुलांवर कर्ज सोडून जातात. जेव्हा सोफिया, अविराजच्या महलमध्ये रॉयल बी अँड बी ऑफर घेऊन जाते. तेव्हा अविराज ते नाकारू शकत नाही. त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो.