मनोरंजन

शशांक केतकर सांगतोय प्रेमाच्या आंबट- गोड मुरांब्याची गोष्ट

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन; 'व्हॅलेंटाईन डे' चे औॅचित्य साधत प्रेमाची आंबट- गोड गोष्ट सांगणारी 'मुरांबा' ही मालिका चाहत्यांच्या भेटीस येत आहे. ही मालिका येत्या १४ फेब्रुवारीला छोट्या पडद्यावर सुरु होत आहे. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर यांने मुख्य भूमिका साकारली आहे. नुकतेच शशांकने दिलेल्या एका मुलाखतीत 'मुरांबा' या मालिकेविषयी माहिती दिली आहे.

मुरांबा मालिकेविषयी काय सांगशील? असा प्रश्न नुकत्याच झालेल्या मुलाखतीत विचारला. यावर उत्तर देताना शशांक केतकर याने सांगितले की, मुरांबा या शीर्षकाप्रमाणेच एक छान आंबट-गोड लव्हस्टोरी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ही एक कौटुंबिक गोष्ट असून नात्यांमधील ऋणानुंबध आणि त्यातला गुंता यावर भाष्य करणारी गोष्ट आहे. जवळपास दीड वर्षांनंतर ही लव्हस्टोरी घेऊन भेटीस येत आहे. १४ फेब्रुवारीला मालिका सुरु होत आहे. त्यामुळे जे प्रेमात आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना प्रेमात पडायचं आहे त्यांच्यासाठी ' मुरांबा' ही मालिका छान गिफ्ट असेल.

याच दरम्यान मालिकेतल्या तुझ्या लुकविषयी काय सांगशील? असे विचारताच शंशाकने मी आणि माझी पत्नी प्रियांका नुकतेच आई-बाबा झालो आहोत. आई-बाबा झालो असलो तरी पूर्वीसारखंच फिट रहायचं आहे. वेटलॉस नाही मात्र, फॅटलॉस केला आहे. त्यामुळे नव्या रुपात आणि नव्या भूमिकेत चाहत्यांना भेटणार असल्याचे सांगितले.

शंशाकने रोमॉन्टिक भूमिकेत पुन्हा दिसणार त्याविषयी खूलासा करताना मी बऱ्याच दिवसांपासून रोमॉन्टिक भूमिकेची वाट पहात होतो. भुमिकेच्या बाबतीत तुम्ही कितीही वेगळा प्रयोग करायला गेलात तरी लव्हस्टोरीची गोष्टच वेगळी आहे. चाहत्यांना लव्हस्टोरी आपलीशी वाटते. मालिकेच्या नावाप्रमाणेच एक आंबट-गोड लव्हस्टोरी आहे. मुरांबा ज्याप्रमाणे मुरला की त्याची चव वाढते अगदी त्याचप्रमाणे मालिकेत नाती मुरताना तुम्ही अनुभवाल. जवळपास ८ वर्षांनंतर काम करतोय.

मुरांबा मालिकेतील तुझ्या व्यक्तिरेखेचं वेगळेपण काय आहे? असे मुलाखतीत विचारताच त्याने अक्षय मुकादम असं व्यक्तिरेखेचं नाव आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारा आणि आजीच्या धाकाखाली वाढलेला असा हा अक्षय. अक्षयला नाती जपायला आवडतात. शशांक आणि अक्षय या दोघांमधलं साम्य असं ती म्हणजे खवय्येगिरी. स्वयंपाक घरात नवनवे प्रयोग करायला मला आवडतात. मालिकेत देखील माझं स्वयंपाक घराशी जवळचं नातं असणार आहे. असं त्यानं सागितलं आहे.

मुरांबाची वेळ दुपारची आहे याविषयी शंशाक म्हणला की, छोट्या पडद्यावरील सर्वच मालिकांना चाहत्याचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चाहत्याच्या प्रेमापोटी दुपार हा नवा स्लॉट सुरु केला आहे. लग्नाची बेडी आणि मुरांबा या दोन मालिका दुपारच्या वेळेत चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. सहकुटुंब जेवणाचा आनंद घेत चाहत्यांना ही मालिका पहाता येईल. असेही त्याने सांगितले.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT