द केरल स्टोरी 2 चा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यात प्रेक्षकांसाठी सस्पेन्स, थरार आणि ऍक्शन यांचा जबरदस्त संगम आहे. टीझरमध्ये स्पष्टपणे दिसतं की या भागात कथानक अधिक तणावपूर्ण आणि संघर्षपूर्ण होणार आहे.
The Kerala Story 2: Goes Beyond Teaser Out now
'द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड' या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला. २०२३ च्या मूळ 'द केरळ स्टोरी'च्या प्रचंड यशानंतर, चित्रपट निर्माता विपुल अमृतलाल शाह सिक्वेल घेऊन परत आले आहेत. "अनेक सत्य घटनांवरून प्रेरित" असलेल्या धक्कादायक कथा अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत.
टीजरमध्ये फसवणूक, मुलींचे शोषण यासारखे गंभीर मुद्द्यांची झलक दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रिलीज होईल. टीजरच्या सुरुवातीला ‘हमारी बेटियां प्यार नहीं करतीं, वे जाल में फंसती हैं’ असा संवाद ऐकू येतो. नंतर 'अब सहेंगे नहीं… लड़ेंगे' असे दमदार संवादच चित्रपटाची कहाणी किती दमदार असेल, हे स्पष्ट होते. यंदाची कहाणी मुळच्या चित्रपटापेक्षी अधिक संघर्षमय असेल.
'द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड'चा टीझर प्रदर्शित
एका अस्वस्थ करणाऱ्या मोशन पोस्टरनंतर टीझरमध्ये कथेची पहिली झलक पाहायला मिळते. २.०६ मिनिटांचा हा टीझर आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कामाख्या नारायण सिंग यांचे दिग्दर्शन आहे. या सिक्वेलमध्ये देशातील विविध राज्यांमधील कहाणी दाखवण्यात आल्या आहेत. टीझरमध्ये तीन महिला त्यांच्या कथा दिसतात.
चित्रपटात उल्का गुप्ता, अदिति भाटिया आणि ऐश्वर्या ओझा मुख्य भूमिकेत आहेत. या तीन महिलांची सत्य कथा पडद्यावर जीवंत होणार आहे. केरळची सुरेखा नायर ही आयएएस अधिकारी बनण्याची आकांक्षा बाळगणारी होती, मध्य प्रदेशची नेहा संत ही भालाफेक खेळाडू आहे, ती ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहते आणि नृत्याची आवड असलेल्या राजस्थानची दिव्या पालीवाल हिला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनायचे असते. धार्मिक धर्मांतरण, फसवणूक, छळ, नियंत्रण...एक भीतीदायक कहानी बनते. अस्वस्थ करणारी कहाणी लवकरच पडद्यावर येईल.